Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अत्यंत साधेपणाने नंदकिशोर मुंदडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Updated: नोव्हेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

अत्यंत साधेपणाने नंदकिशोर मुंदडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

चार दशकांच्या राजकीय आयुष्यात प्रथमच प्रत्यक्ष निवडणूक लढवणार

अंबाजोगाई : शहरातील सर्व समाजघटकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केलेल्या नंदकिशोर मुंदडा यांनी शनिवारी (दि.१५) नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करत त्यांनी साधेपणा, संयम आणि लोकाभिमुख शैलीची पुन्हा एकदा प्रचिती दिली. चार दशके लोकांसाठी अखंडपणे काम करत असताना कधीही पदाची इच्छा न बाळगणाऱ्या या नेतृत्वाने प्रथमच प्रत्यक्ष निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने शहरात त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे.

मुंदडा यांचा ४७ वर्षांचा सार्वजनिक प्रवास राजकारण आणि समाजकारणाच्या अविरत कार्याने परिपूर्ण आहे. स्व. डॉ. विमलताई मुंदडा आणि आमदार नमिता मुंदडा यांच्या राजकीय यशामागे सतत कार्यरत राहून त्यांनी कधीही स्वतःसाठी कोणतेही राजकीय पद मागितले नाही. घरात आमदारकीचे एकच पद आणि इतर सर्व पदे कार्यकर्त्यांसाठी ठेवण्याचा त्यांचा निर्णय कायम राहिला. त्यामुळे अंबाजोगाईतील जनतेकडून त्यांना असलेला विश्वास वर्षानुवर्षे अधिक दृढ होत गेला. यावेळी मात्र शहरातील अनेक नागरिक आणि कार्यकर्ते अंबाजोगाईच्या सर्वांगीण विकासासाठी यावेळी नंदकिशोर मुंदडांनी स्वतः उमेदवारी घ्यावी, अशी मागणी सातत्याने करत होते. विकासकामांची सुरू असलेली गती, नव्या प्रकल्पांचे होणारे नियोजन आणि शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याने त्यांनी अखेर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांचे उमेदवारीचे शहरातून प्रचंड स्वागत होत आहे. अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून, कॉलवर त्यांना शुभेच्छा दिल्या. काकाजी स्वतः निवडणुकीच्या मैदानात असल्याने त्त्यांच्यावर विश्वास ठेवत अनेक नेते आणि कार्यकर्त्यांचे दररोज भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहेत.

दरम्यान, शनिवारी कुठलाही तामझाम, बडेजाव किंवा शक्तीप्रदर्शन न करता नंदकिशोर मुंदडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. उर्वरित दोन दिवसात नगरसेवक पदासाठीच्या मुंदडा गटाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल होणार आहेत. एकंदरीत, आगामी निवडणूक अंबाजोगाईच्या विकासाच्या दिशेने निर्णायक ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


Categories

Recent Posts