Breaking
Updated: डिसेंबर 18, 2025
आठ जणांवर परस्परविरोधी गुन्हे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआठ जणांवर परस्परविरोधी गुन्हे
केज – विहिरीच्या पाण्यावरून दोन भाऊ एकमेकांना भिडले. त्यांनी कुऱ्हाड, कती आणि काठीने एकमेकांना मारहाण केल्याने दोघे जण जखमी झाल्याची घटना येवता (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या आठ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
येवता येथील मल्हारी लक्ष्मण सक्राते (वय ५३) यांच्या फिर्यादीनुसार ते १७ डिसेंबर सांयकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शेतात असताना त्यांचा भाऊ अशोक लक्ष्मण सक्राते, प्रणव अशोक सक्राते, समाधान अशोक सक्राते, शिवकन्या अशोक सक्राते आले. त्यांनी विहिर आमची आहे, तु पाण्याची मोटर चालू करू नकोस असे म्हणत शिवीगाळ करू केली. त्यांना बारीने पाणी घेऊ असे म्हणाले असता अशोक याने कुऱ्हाड डोक्यात मारून जखमी केले. तर इतरांनी काठीने व चापटाबुक्याने मारहाण करीत आमच्या विहिरीजवळ पाऊल ठेवायचे नाही असे म्हणत जिवे मारण्याची दिली. मल्हारी यांच्या तक्रारीवरून वरील चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या गटाचे प्रणव अशोक सक्राते यांच्या तक्रारीनुसार ते १७ डिसेंबर रोजी विहिरीवर मोटार चालू करण्यास गेले असता त्यांचे चुलते मल्हारी लक्ष्मण सक्राते, दिपक मल्हारी सक्राते, प्रविण मल्हारी सक्राते, शारदा मल्हारी सक्राते हे आले. त्यांनी विहिरीवरची मोटर चालु करू नकोस, विहिर व पाण्याची मोटर आमची आहे असे म्हणत शिवीगाळ सुरू करीत चापटाबुक्यानी मारहाण केली. तर मल्हारी यांनी कतीने हातावर मारून जखमी केले. इतरांनी दगडाने मारून मुक्कामार दिला. विहिरीजवळ पाऊल ठेवल्यास तुम्हाला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. प्रणवच्या तक्रारीवरून वरील चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार हनुमान मुंडे हे करीत आहेत.