Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

प्रभाग 11 मध्ये अपक्ष किरण कांबळे व महेबूब गवळी यांच्या पाठीशी उभी राहिली जनशक्ती

Updated: नोव्हेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

मतदारांची प्रचंड सहानुभूती; प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मतदारांची प्रचंड सहानुभूती; प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद

अंबाजोगाई : अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. ११ मध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी सरळ लढत निर्माण झाली आहे. धनशक्तीला डावलून प्रभागातील नागरिकांनी अनुसूचित जाती गटातून किरण दत्तू कांबळे आणि सर्वसाधारण गटातील महेबूब सुलेमान गवळी या दोन अपक्ष उमेदवारांच्या पाठीशी जनशक्ती उभा केल्याचे गुरुवारी झालेल्या प्रचार रॅलीतून स्पष्ट झाले. मतदारांचा मोठ्या प्रमाणात कल दोघांकडे झुकलेला रॅलीतून दिसून आले.

गांधीनगर, अब्दुल रहेमान कॉलनी, गवळीपुरा आणि मिलिंदनगर परिसरात काढण्यात आलेल्या रॅलीत नागरिकांनी दत्तू कांबळे (डिके) आणि मेहबूब गवळी या दोन्ही उमेदवारांचे स्वागत करत मतदार राजाची सहानुभूती स्पष्टपणे दर्शवली. अनेक मतदारांनी प्रत्यक्ष भेटीत मतदानाचे आश्वासन देत कांबळे आणि गवळी यांच्या बाजूने सार्वजनिक पाठींबा जाहीर केला.

किरण कांबळे आणि महेबूब गवळी या दोघांचा प्रभागात दांडगा जनसंपर्क असून मागील दहा वर्षांपासून दोघेही नागरिकांच्या प्रश्‍नात तातडीने धावून जात असल्यामुळे त्यांची ओळख कार्यतत्पर आणि चोवीस तास उपलब्ध असणारे नेतृत्व अशी निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर प्रभागातून निवडणूक लढवण्याची सातत्याने तयारी असतानाही वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरावे लागले. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या बाजूने तीव्र सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचे चित्र आज उभे राहिले.

प्रभागातील नागरिकांनीच आता निवडणूक आपल्या हातात घेतल्याचे वातावरण असून किरण कांबळे आणि महेबूब गवळी यांच्या पाठीशी मतदारांचा भक्कम आधार दिसू लागला आहे. दोघांचा डोअर टू डोअर प्रचार जोरात सुरू असून स्वच्छता, पाणीपुरवठा आणि स्थानिक मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी रॅलीतून ठोस भूमिका मांडली. रॅलीत प्रभागातील नागरिकांचा मोठा सहभाग नोंदवला गेला असून धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढतीत जनशक्तीचे हे अपक्ष उमेदवार निश्चितच विजयो होतील होतील, असे राजकीय वातावरण प्रभागात तयार झाले आहे.


Categories

Recent Posts