Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना अंबाजोगाई न्यायालयाचा मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

Updated: जानेवारी 27, 2026

By Vivek Sindhu

सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना अंबाजोगाई न्यायालयाचा मोठा दिलासा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: बारामती येथील एका तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली गोवल्या गेलेल्या आरोपींना अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणातील आरोपी बदामबाई गोकुलदास वैष्णव आणि मनोज काळे (रा. अंबाजोगाई) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मा. न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी २३ जानेवारी २०२६ रोजी मंजूर केला. फिर्यादीने दिलेली माहिती आणि आठ महिन्यांच्या विलंबानंतर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा कशा प्रकारे बनावट आहे, हे बचाव पक्षाच्या वतीने ॲड. अजित लोमटे यांनी न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडले.

कनेरी (ता. बारामती, जि. पुणे) येथील एका महिलेने बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या मुलीला नृत्य आणि गायनाची आवड असल्याने अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ हिने तिला आपल्या कलाकेंद्रात कामासाठी बोलावले होते. २४ एप्रिल २०२५ रोजी मुलीला अंबाजोगाई येथील पायल कलाकेंद्रात नेल्यानंतर तिला वेश्या व्यवसायास प्रवृत्त करण्यात आले आणि नकार दिल्यावर बेदम मारहाण करण्यात आली, असा आरोप फिर्यादीने केला होता. त्यानंतर मुलीला एका लॉजवर नेऊन मनोज काळे, प्रमोद गायकवाड आणि इतर एका व्यक्तीने आळीपाळीने तिच्यावर जबरदस्ती केली, अशी धक्कादायक माहिती तक्रारीत देण्यात आली होती. या तक्रारीवरून बारामती येथे गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. अजित लोमटे यांनी न्यायालयात बाजू मांडली. युक्तिवाद करताना ॲड. अजित लोमटे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, कथित घटनेनंतर तब्बल ८ महिन्यांनी ही तक्रार दाखल करण्यात आली असून हा सर्व प्रकार बनावट आणि केवळ आरोपींना गोवण्यासाठी रचलेला एक मनघडत कट आहे. त्यांनी सादर केलेले महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्रे पाहता, प्रथमदर्शनी हा गुन्हा संशयास्पद वाटत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. ॲड. अजित लोमटे यांचा हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.

न्यायालयाने दोन्ही आरोपींना ५०,००० रुपयांच्या जामिनावर आणि तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. या महत्वपूर्ण प्रकरणात ॲड. अजित लोमटे यांना ॲड. नवनाथ साखरे, ॲड. किशोर देशमुख, ॲड. विश्वजित जोशी, ॲड. धनराज लोमटे, ॲड. धोत्रे, ad. सुरेश करपे, ॲड. अभिजित सोळंके, ॲड. गिराम आणि ॲड. गडदे यांनी कायदेशीर सहकार्य केले.


Categories

Recent Posts