Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईतील सक्रीय तरुणांचा मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश

Updated: नोव्हेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाईतील सक्रीय तरुणांचा मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नंदकिशोर मुंदडा यांच्यासह सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्याचा केला निर्धार

अंबाजोगाई : नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ नेते तथा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांच्या नेतृत्वावर वाढत असलेला तरुणांचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे. शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या तरुणांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश करून त्यांच्या प्रचाराला निर्णायक वेग दिला आहे. निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि प्रतिसादक्षम नेतृत्व यांना प्राधान्य देणाऱ्या तरुणांनी नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखालील टीमला संपूर्ण पाठींबा जाहीर केला आहे.

शहरातील युवा कार्यकर्ते आर्यन मांदळे यांनी आपल्या मित्रपरिवारासह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार नमिता मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मांदळे यांनी शहरातील समस्यांवर योग्य पद्धतीने काम करणाऱ्या, नागरिकांच्या अडचणींना वेगाने प्रतिसाद देणाऱ्या आणि विकासकामांना गती देणाऱ्या नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचे सांगितले. मांदळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकाजी यांच्यासह सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, अंबाजोगाईतील गौरव कुचेकर यांनीही आपल्या मित्रपरिवारासह भाजपा प्रवेश केला. शहरातील वाढत्या विकासकामांची गती, नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी आणि नागरिकांना तत्पर मदत करण्याची काकाजींची शैली यामुळे प्रभावित झाल्यामुळे होऊन पक्षात प्रवेश केल्याचे कुचेकर यांनी सांगितले. याशिवाय अंबाजोगाईतील युवा कार्यकर्ते उज्जैन बनसोडे, महेश उर्फ गुड्डू जोगदंड, योगेश माने, गौतम शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही पक्षात प्रवेश केला. या प्रवेशप्रसंगी काकाजी यांच्या उपस्थितीत नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. भाजप हा विकास आणि जबाबदारीचा पक्ष असल्याने तरुणांना त्यात काम करण्याची संधी झाल्याचे मत तरुणांनी व्यक्त केले.

निवडणुकीच्या अगदी तोंडावर तरुणांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला प्रवेश नंदकिशोर मुंदडा यांच्या प्रचाराला निर्णायक बळ देणारा घटक ठरला आहे. शहरातील बहुतेक प्रभागांमध्ये तरुण मतदारांचे प्रमाण मोठे असून त्यांच्यातील या नव्या उत्साहामुळे प्रचारयंत्रणेला दिशा मिळाली आहे. मुंदडा परिवाराच्या विकास कामांवरील विश्वास, नागरिकांना अडचणीच्या काळात मिळणारा तत्काळ प्रतिसाद, सामाजिक कार्यातील सहभाग आणि २४ तास सर्वांसाठी उपलब्ध असणारे नेतृत्व या गुणांमुळे नंदकिशोर मुंदडा यांना युवा वर्गाचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या अगदी जवळ मोठ्या संख्येने तरुण भाजपमध्ये दाखल होत असल्याने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा आणि नगरसेवक पदासाठीच्या सर्व उमेदवारांची बाजू अधिक बळकट झाली आहे.


Categories

Recent Posts