Breaking
Updated: नोव्हेंबर 15, 2025
अंबाजोगाईत महिला शक्तीचा भाजपला मोठा पाठिंबा; सरिता बैरागी यांच्यासह सहकाऱ्यांचा प्रवेश
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांचा वाढता राजकीय सहभाग भाजपसाठी निर्णायक ठरत असून, नुकत्याच झालेल्या महत्त्वपूर्ण प्रवेशामुळे नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाला नवी मजबूती मिळाली आहे. दक्ष पोलीस मित्र परिवार फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या अध्यक्षा सरिता सचिन बैरागी यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश जाहीर केला.
समाजकार्य, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने कार्यरत असलेल्या बैरागी यांनी पक्षात प्रवेश करताना नगर परिषद निवडणुकीत नंदकिशोर मुंदडा यांच्यासह सर्व भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरात सुरक्षितता आणि विकासाच्या दृष्टीने मजबूत नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या महिला कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची संघटनशक्ती आणखी बळकट झाली आहे. नगर परिषद निवडणुकीत या मजबूत महिला शक्तीचा थेट फायदा होणार असून नंदकिशोर मुंदडा यांचे पारडे अधिक जड होत आहे.
या प्रवेशप्रसंगी कल्पना व्यंकट चौधरी, ताई रमेश्वर इंगळे, मंगल सुरेश इंगळे, वच्छला बजरंग शिनगारे, लक्ष्मी अरुण मंत्री, शिंदु शाम मंडे, शिवकन्या आकाश शिंदे, प्रतिभा अविनाश शिंदे, आरती शंकर कटप, पंचफुला बबन कांबळे आणि तेजस्विनी दुर्वास काटे यांनी भाजप प्रवेश केला. सर्व कार्यकर्त्यांना पक्षाचा झेंडा देऊन स्वागत करण्यात आले. आमदार नमिता मुंदडा यांनी सर्व नव्या महिला सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत करत त्यांच्या आगामी राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. महिलांचा हा संघटित व उत्साही पाठिंबा आगामी निवडणुकीत भाजपच्या प्रचारयंत्रणेला निर्णायक ताकद देणारा आहे.