Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईत लोकविकास महाआघाडीची जोरदार मुसंडी

Updated: नोव्हेंबर 21, 2025

By Vivek Sindhu

लोकविकास महाआघाडीची अंबाजोगाई शहरात जोरदार मुसंडी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

प्रत्येक प्रभागातून राजकिशोर मोदी आणि सहकाऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबाजोगाई : नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकविकास महाआघाडीने शहरात प्रचाराची जोरदार आक्रमक मोहीम राबवली असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी आणि त्यांचे १५ प्रभागांतील ३१ शिलेदार यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध प्रभागांत फिरताना मोदी आणि त्यांची टीम यांना मिळणारा प्रतिसाद पाहता लोकविकास महाआघाडीने अंबाजोगाईत मजबूत पकड घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या युतीतून लोकविकास महाआघाडीची स्थापना झाली. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पार्टी ऑफ इंडिया या पक्षांनीही बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने महाआघाडीचे पारडे आणखी जड झाले आहे.

प्रचाराचा भाग म्हणून राजकिशोर मोदी, मोईन भाई आणि रौफ बिल्डर यांनी प्रभाग १२ मध्ये भव्य प्रचार रॅली काढली. सदर बाजार, पेन्शनपुरा, मियाभाई कॉलनी, मोची गल्ली, शिंपी गल्ली, भोई गल्ली आदी भागात मतदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. नागरिकांनी मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जोरदार स्वागत करत विश्वास व्यक्त केला.

शहरातील विविध परिसरातून मिळणाऱ्या या प्रतिसादामुळे लोकविकास महाआघाडीबद्दल अंबाजोगाईकरांचा भरवसा लक्षणीयरीत्या वाढल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात स्पष्टपणे दिसत आहे.


Categories

Recent Posts