Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईला सुरक्षित, सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम बनविण्याचा आमचा संकल्प – राजकिशोर मोदी

Updated: नोव्हेंबर 26, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाईला सुरक्षित, सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम बनविण्याचा आमचा संकल्प - राजकिशोर मोदी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पापा मोदी हेच बदलू शकतात अंबाजोगाईचा चेहरा मोहरा – लोक विकास महाआघाडीवर अंबाजोगाईकरांचा विश्वास

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाईला सुरक्षित, सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम बनवण्यासाठी व्यापक विकास दिशा निश्चित करण्यात आली असून, त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्थानिक रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती, असे लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांनी जाहीर केले. भविष्यातील अंबाजोगाई अधिक सक्षम करण्याच्या उद्दिष्टाने शहरात अत्याधुनिक ‘इंडस्ट्रियल पार्क (MIDC)’ उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. हा उपक्रम संकेत मोदी यांच्या संकल्पनेतून आणि राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात येणार आहे. अंबाजोगाईला सुरक्षित, सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम बनविण्याचा संकल्प व विकासाची दृष्टी असलेले पापा मोदी हेच बदलू शकतात अंबाजोगाईचा चेहरा मोहरा असा अंबाजोगाईकरांचा विश्वास लोक विकास महाआघाडीवर आहे.

या संदर्भात आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मोदी यांनी सांगितले की, रोजगारासाठी पुणे, मुंबई, संभाजीनगर आदी शहरांकडे जाणारा तरुणांचा ओघ मोठा आहे. मात्र इंडस्ट्रियल पार्क उभारल्यानंतर अंबाजोगाईतील प्रत्येक कुटुंबापर्यंत रोजगाराच्या संधी पोहोचतील. विविध कामगार घटकांना स्थानिक पातळीवरच रोजगार मिळेल आणि नागरिकांना नोकरीसाठी घरदार सोडण्याची वेळ येणार नाही. यासाठी दर्जेदार रस्ते, पाणी, वीज, जलनिस्सारण, औद्योगिक प्लॉट्स, तयार शेड्स आणि गाळे अशा सर्व मूलभूत तसेच व्यावसायिक सुविधा उपलब्ध असलेले अत्याधुनिक औद्योगिक क्षेत्र विकसित केले जाणार आहे. व्यवसायांना ‘सिंगल विंडो क्लिअरन्स’ प्रणालीद्वारे परवानग्यांची सुलभता मिळेल. याशिवाय कचरा व्यवस्थापन, आर्थिक सहाय्य योजना, कौशल्यवर्धन प्रशिक्षण उपक्रम यांसारख्या पूरक सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. मोदी यांनी म्हटले की, या प्रकल्पामुळे अंबाजोगाईत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होईल, शहराची आर्थिक प्रगती वेग घेईल आणि आत्मनिर्भरतेचा पाया मजबूत होईल. “प्रत्येक तरुणाच्या हाताला काम, प्रत्येक कुटुंबात स्थैर्य आणि एक सक्षम अंबाजोगाई उभारणे हा आमच्या व्हिजनचा मुख्य हेतू आहे. हा बदल, हा विकास आपण सर्वांनी मिळून घडवायचा आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

विश्वास जुना, पापा मोदी पुन्हा..!

अंबाजोगाईच्या मुख्य रस्त्यांवर व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय यासाठी घेतला होता की, आपल्या शहरातील स्थानिक तरुणांना मोठ्या शहरात न जाता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळावी. नगराध्यक्ष कार्यकाळात शहराच्या आर्थिक प्रगतीसाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे अनेकांच्या कष्टाला योग्य दिशा मिळाली. या व्यापारी संकुलांमधून आज असंख्य कुटुंबांना रोजगार मिळाला, घरात स्थैर्य निर्माण झालं आणि अंबाजोगाईतही संधी आहे हा विश्वास अधिक दृढ झाला. संकुल उभारणीमुळे फक्त दुकाने वाढली नाहीत तर प्रत्येक कुटुंबाला आपलं भविष्य घडवण्यासाठी सुरक्षित आणि कायमस्वरूपी स्थान मिळालं. मुख्य रस्त्यांवरील वाढता व्यवसाय, वाढणारा व्यापार आणि आज आत्मविश्वासाने पुढे चाललेल्या अनेक उद्योजकांकडे पाहिलं की, त्या निर्णयाचा खरा परिणाम दिसून येतो. पुढील काळातही अंबाजोगाईतील रोजगार आणि उद्योजकतेला अधिक वेग देण्यासाठी नवीन संधी आणि मजबूत पायाभरणी करण्याचा निर्धार कायम आहे.


Categories

Recent Posts