Breaking
Updated: डिसेंबर 24, 2025
अंबाजोगाईकरांच्या सेवेसाठी कायम कटिबद्ध - राजकिशोर मोदी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई – अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मतदार बंधू आणि भगिनींनी दिलेला आशिर्वादरूपी मतदानाचा कौल आम्ही मान्य केला आहे. तसेच लोक विकास महाआघाडीला भरभरून आशीर्वाद देवून सर्वाधिक २० नगरसेवक निवडून दिल्याबद्दल अंबाजोगाईकरांचे आम्ही शतशः आभारी आहोत. यापुढील काळातही अंबाजोगाईकरांच्या सेवेसाठी आम्ही सर्वजण कायम कटिबद्ध राहूत असे प्रतिपादन राजकिशोर (पापा) मोदी यांनी केले.
३१ नगरसेवकांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भरभरून आशीर्वाद दिला. २० नगरसेवक निवडून आणण्यात लोक विकास महाआघाडीला यश आले. ‘कपबशी’ला मतदारांनी पुन्हा एकदा कौलरूपी आशिर्वाद दिला. लोक विकास महाआघाडीच्या वतीने नवनिर्वाचित २० नगरसेवकांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, अंबाजोगाईकरांचे आशिर्वाद व प्रेम सदैव आमच्या पाठीशी आहे. अंबाजोगाईच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. सर्वांना सोबत घेऊन शहरातील बँकींग, सहकार, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा, समाजकारण, नाट्य, साहित्य, आध्यात्मिक क्षेत्रात चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शहरातील आठरापगड जातीधर्मासाठी काम करीत आहोत. निवडणुक म्हटले की, जय – पराजय असतो. लोक विकास महाआघाडीचे सर्वाधिक २० उमेदवार निवडून देत जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांचा तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही यापुढेही अंबाजोगाईकरांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहूत असा शब्द देतो असे सांगून नवनिर्वाचित सहकाऱ्यांचे पापा मोदी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी आमदार पृथ्वीराज साठे, महेंद्र निकाळजे, सुनिल जगताप, राजेश वाहुळे, राजेश परदेशी, बबनराव लोमटे, अमर देशमुख, ऍड.अजित लोमटे, गफार भाई, ऍड.विशाल घोबाळे, खालेद चाऊस, संकेत मोदी, डॉ.राजेश इंगोले, महेश लोमटे, अमोल लोमटे, सचिन जाधव, शेख मोईनभाई, रौफ बिल्डर, भिमसेन लोमटे, सय्यद रशीदभाई, शेख मुख्तार, गणेश मसने, जावेद गवळी यांच्यासह प्रभाग ३ मधील महेश बाळासाहेब कदम आणि शेख शिरीन अशफाक, प्रभाग ४ मधील सौ.श्रुतीताई अमोलराव लोमटे आणि महेश बालासाहेब लोमटे, प्रभाग ५ मधील मालू भगवान जोगदंड आणि सौ.संगिताताई दाजीसाहेब लोमटे, प्रभाग ६ मधील आकाश जिवनराव कराड, प्रभाग ९ मधील दिनेश मोतीलाल भराडिया आणि सौ.दिपाताई बबन ऊर्फ दाजीसाहेब लोमटे, प्रभाग १० मधील सय्यद ताहेर अब्दुल, प्रभाग ११ मधील सौ.सोनीताई दत्तात्रय सरवदे आणि हाजी इस्माईल हिरू गवळी, प्रभाग १२ मधील शेख शमीम शेख रहीम आणि बशीरा शफीक सय्यद, प्रभाग १३ मधील राजपाल संभाजी जावळे आणि नाजनीन बेगम अकबरखाँ पठाण, प्रभाग १४ मधील नजीर उमरदराजखान पठाण तर प्रभाग १५ मधील सौ.जयश्रीताई पृथ्वीराज साठे, सौ.रेखाताई विलास जाधव, विकास रामकृष्ण काकडे हे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांचा राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन ह्रद्य सत्कार करण्यात आला.