Breaking
Updated: डिसेंबर 10, 2025
अंबाजोगाई स्ट्रॉंग रूमला कडक सुरक्षा - उपजिल्हाधिकारी वजाळे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी अंबाजोगाई येथे अत्यंत कडक आणि पारदर्शक व्यवस्था करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांनी ही सुरक्षा केवळ मजबूतच नाही, तर उमेदवारांसाठी ‘लाइव्ह’ पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
वजाळे यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे निवडणुकीच्या निकालापूर्वीच सुरक्षा व्यवस्थेबद्दल सर्वसामान्य मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.
सीसीटीव्ही लाईव्ह स्क्रीनिंगद्वारे सुरक्षा पारदर्शक
निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईव्हीएम सुरक्षित ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमवर सतत देखरेख ठेवण्यासाठी आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या आठ कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण (Live Feed) स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एका मोठ्या स्क्रीनवर दाखवले जात आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच सामान्य मतदारांना स्ट्रॉंग रूममधील ईव्हीएमची सुरक्षा या स्क्रीनवर लाईव्ह पाहता येत आहे. स्क्रिनिंग पाहण्यासाठी त्या ठिकाणी आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे, ज्यामुळे उमेदवारांच्या प्रतिनिधींना २४ तास देखरेख ठेवता येईल.
एसआरपीएफ आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त
स्ट्रॉंग रूमला कडक सुरक्षा प्रदान करण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अंबाजोगाईत नगराध्यक्ष पदासाठी नऊ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी दोनशे पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत. २ डिसेंबर रोजी ६९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली, ज्यात ४६ हजार १७८ मतदारांनी आपला हक्क बजावला. आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे.
उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांच्या या अभिनव आणि पारदर्शक सुरक्षा व्यवस्थेमुळे अंबाजोगाईतील निवडणूक प्रक्रिया आदर्शवत ठरत आहे.