Breaking
Updated: नोव्हेंबर 12, 2025
अंबाजोगाई शहरातील असंख्य युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहरातील विविध प्रभागातील तरुण युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. अंबाजोगाई शहराचे विकास पुरुष माजी नगराध्यक्ष यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन तसेच त्यांनी अंबाजोगाई शहराचा मागील पंचवीस वर्षात केलेला विकास पाहून शहरातील युवा कार्यकर्ते अनिकेत पटाईत व युवराज पटाईत, मुनिर शहा व भीमसेन लोमटे यांच्या माध्यमातून अनेक युवकांनी जाहीर पक्षप्रवेश केला. पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार , प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, जिल्हाध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण , तसेच युवा जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांच्या विचारांवर प्रेरित होऊन तसेच त्यांचेच विचार गावपातळीवर पोचवण्यासाठी अंबाजोगाई शहरातील विविध भागातून शेकडो युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी युवा नेते तथा श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, सुनील वाघाळकर,अंकुश हेडे, निसार बेग,महेश कदम, शुभम टेकाळे, प्रशांत टेकाळे महेश वाघमारे, आकाश वाघमारे, दत्ता काळे, सुरज चव्हाण, वैभव टेकाळे, वेदांत काटे, महेश्वर सुरवसे, रोहित गंजेवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलेल्यामध्ये प्रामुख्याने अनिकेत पटाईत व युवराज पटाईत यांच्या माध्यमातून नामदेव पवार, बालाजी सुरवसे, महेश शिंदे, ऋषिकेश पटाईत, गुलाब भवर, पवन भवर, किशोर जेधे, आदित्य सोमवंशी, बिरू शिंपले, कृष्णा जेधे, सुरज काळजाते, पंकज काळदाते, किरण पाथरकर, अनिकेत शिंदे, ओम शिंदे, शाहिद सय्यद, अविनाश हेडे, मानव काळदाते, अजय पटाईत, स्वप्निल पटाईत, शुभम शिर्के, दत्तात्रय जेधे आणि अनिकेत घोडके त्याचबरोबर
शहरातीलच अर्जुन चौरे, राजू थाटकर, प्रमोद थाटकर, अशोक खामकर, नरेश सोमवंशी, भागवत काळे आणि अनिकेत शेवाळे या उत्साही तरुणांचा समावेश आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्या प्रवेशाने पक्षात नवीन उर्जा आणि उत्साह संचारला असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे. अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने या सर्व युवकांनी पक्षाच्या विचारधारेवर व नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षात जाहीर प्रवेश केलेल्या युवकांची ऊर्जा व त्यांच्या कार्य तत्परतेतून पक्षाचे कार्य अधिक मजबूत व बळकट होईल असा विश्वास याप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला.
आजचा नवयुवक हा देशाचे उद्याचे भविष्य आहे. त्यामुळे युवकांनी शिकून संघटित होऊन आपल्या समाजासाठी पर्यायाने देशासाठी कार्य करावे असे मत संकेत मोदी यांनी व्यक्त केले. पक्षप्रवेश झालेल्या सर्व युवकांचे अभिनंदन करून त्यांना आपापल्या प्रभागात पक्षाचे विचार घरोघरी पोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील यावेळी राजकिशोर मोदी व संकेत मोदी यांनी केले.