Breaking

अंबाजोगाई पीपल्स बँक भारतरत्न सहकारीता सम्मान-२०२६ ने सन्मानित

Updated: जून 10, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाई पीपल्स बँक भारतरत्न सहकारीता सम्मान-२०२६ ने सन्मानित

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बेस्ट चेअरपर्सन म्हणून राजकिशोर मोदी तर अंबाजोगाई पीपल्स ठरली बेस्ट अर्बन को ऑपरेटिव्ह बँक

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, भारत नेटवर्क ग्रुप आणि नॅफकब यांच्या संयुक्त विद्यमाने भारत को-ऑपरेटिव्ह बँकींग समेट व प्रशिक्षण यांचे आयोजन नुकतेच ५ ते ७ जून रोजी लखनौ (उत्तर प्रदेश) येथे करण्यात आले होते. या राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमात अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंबाजोगाई या बँकेला बेस्ट चेअरपर्सन म्हणून बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी तर अंबाजोगाई पीपल्स ठरली बेस्ट अर्बन को ऑपरेटिव्ह बँक या दोन श्रेणी मध्ये भारतरत्न सहकारीता सम्मान-२०२६ ने सन्मानित करण्यात आले. अंबाजोगाई पीपल्स बँकेने नेहमीच पारदर्शक, गतिमान कारभार व तत्पर ग्राहक सेवेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण उत्तम टीमवर्क करून बँकेने जलद व अत्याधुनिक सेवा देवून सभासद, ठेविदार, ग्राहक आणि हितचिंतक यांची विश्वासार्हता कमावली आहे.

यंदा चालू आर्थिक वर्षामध्ये बँकेस मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे. हे दोन पुरस्कार उत्तम टीम वर्कचेच फलित आहे. सहकार क्षेत्रामध्ये काम करीत असताना एखाद्या बँकेने केंद्र सरकार, आरबीआय, सहकार खाते आणि बँकींगचे सर्व नियम पाळून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत बँकींग सेवा, विविध सुविधा उपलब्ध करून देते. गतवर्षी अंबाजोगाई पीपल्स बँकेस एनपीएचे व्यवस्थापन सर्वोत्तम केले याची दखल घेत आशिया खंडातील सहकारी बँकिंगसाठी सर्वात मोठे व्यासपीठ असलेले भारत को-ऑपरेटीव्ह बँकिंग समितीच्या वतीने मुंबई येथे भारतरत्न सहकारिता पुरस्कार देवून गौरविण्यात आलेले आहे. तर सलग दुसऱ्या वर्षी मागील महिन्यात बँकेस क्रेस्ट इन्फो मिडिया यांच्या वतीने पुणे येथे आयोजित ऑल इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकींग सम्मीट ऍण्ड अवॉर्ड – २०२६ या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा उपक्रम पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे. तर नुकतेच पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, भारत नेटवर्क ग्रुप आणि नॅफकब यांच्या संयुक्त विद्यमाने भारत-को-ऑपरेटिव्ह बँकींग समेट व प्रशिक्षण यांचे आयोजन ५ ते ७ जून २०२६ रोजी लखनौ (उत्तर प्रदेश) येथे करण्यात आले होते. या राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमात अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंबाजोगाई या बँकेला बेस्ट चेअरपर्सन म्हणून बँकेचे चेअरमन राजकिशोर कांताप्रसाद मोदी तर अंबाजोगाई पीपल्स ठरली बेस्ट अर्बन को ऑपरेटिव्ह बँक या दोन श्रेणी मध्ये भारतरत्न सहकारीता सम्मान-२०२६ देवून सन्मानित करण्यात आले. सदरचा पुरस्कार रामदा बाय विंडहॅम लखनौ हॉटेल आणि कन्वेन्शन सेंटर येथे आयोजित एका विशेष समारंभात बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी, संचालक प्रा.वसंत चव्हाण, संचालक ऍड.विष्णुपंत सोळंके यांनी स्विकारला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह असे आहे. यावेळी पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, भारत नेटवर्क ग्रुप आणि नॅफकब यांच्या संयुक्त विद्यमाने भारत-को-ऑपरेटिव्ह बँकींग समेट व प्रशिक्षण प्रसंगी झालेल्या समेटमध्ये सर्वांसाठी डिजिटल बँकिंग : आर्थिक समावेश आणि संधींचा विस्तार, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास : सहकारी बँकिंगसाठी कोअर बँकिंगचे आधुनिकीकरण, सहकारी बँकिंग परिसंस्थेचे संरक्षण : आधुनिक सायबर आणि जोखीम धोरणे, ग्राहक ते सदस्य : सहकारी बँकिंग मॉडेल मधील अनुभवाची पुर्नव्याख्या अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या समेटमध्ये विविध प्रॉडक्टविषयी प्रेझेन्टेशन दाखविण्यात आले. याचबरोबर विविध श्रेणींसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच दिनांक ०५ जून २०२६ रोजी संध्याकाळच्या सत्रात पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन तर्फे नागरी सहकारी बँकांसाठी नवीन कामगार कायदे आणि भारतातील सहकारी बँकांवरील त्यांचा परिणाम या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत सहभागी बँकांना पुढील विषयांवर व्यावहारिक माहिती देण्यात आली. ती अशी नवीन कामगार कायदे आणि अनुपालन आवश्यकता समजून घेणे, सहकारी बँकांमधील मनुष्यबळ धोरणे आणि कर्मचारी व्यवस्थापनावरील परिणाम,‌ लहान आणि मध्यम आकाराच्या सहकारी संस्थांसमोरील अनुपालनाची आव्हाने, अंमलबजावणी आणि जोखीम कमी करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती,‌ सदस्य बँका आणि मनुष्यबळ प्रमुखांसोबत मुक्त संवाद या संदर्भात मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. भारतरत्न सहकारीता सम्मान-२०२६ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंबाजोगाई या आपल्या बँकेने सुरूवाती पासून एनपीए कमीत-कमी राखला आहे. सर्वच शाखांतून बँकींग विषयक सर्व आधुनिक सेवा, सुविधा, नवे तंत्रज्ञान, डिजिटल व्यवहार बँक सभासद आणि ग्राहकांना पुरविते. यापूर्वी ही बँकेस विविध सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बँकेने मिळविलेले आजचे हे यश दिवंगत लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख, दिवंगत लोकनेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दिवंगत लोकनेते माजी आमदार बाबुरावजी आडसकर तसेच माजी कृषिमंत्री आमदार धनंजयजी मुंडे, माजी आमदार अमरसिंहजी पंडित यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मोलाची मदत व सहकार्य लाभल्यामुळे प्राप्त झाले आहे. या सोबतच बँकेचे सर्व सन्माननीय संचालक, ठेवीदार, कर्जदार, भागधारक, ग्राहक, हितचिंतक तसेच सभासदांच्या सातत्यपूर्ण विश्वास व सहकार्याच्या भावनेमुळेच शक्य झाले असल्याचे देखील या पत्रकात नमूद केले आहे. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेची एकूण सभासद संख्या १३,१५८ एवढी असून त्याच्या बळावरच बँकेच्या सभासद तथा ग्राहकांना रू. ३६९ कोटी इतके कर्जवाटप केले आहे. या आर्थिक वर्षाचे रू.२१ कोटी एवढे भाग भांडवल असून बँकेचा स्वनिधी रू.५४ कोटी एवढा आहे. त्याच बरोबर वर्ष अखेरीस बँकेने एकूण रू.३५० कोटी एवढी गुंतवणूक केली आहे. बँकेने एकूण ठेवी रू.६६५ कोटी इतक्या जमा केलेल्या आहेत. सर्व ठेवींना विमा संरक्षण आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १३० कोटी रूपयांची व्यवसायात वाढ झाली आहे. स्थापनेपासून बँकेने लेखा परिक्षण वर्ग-अ कायम राखला आहे. तर अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेने मार्च २०२६ अखेर तब्बल १ हजार ३२ कोटींचा एकूण बँकिंग व्यवसाय केला असून शुन्य टक्के नेट एनपीए राखण्यात बँकेस यश आले आहे. तर बँकेने ५ कोटी २६ लक्ष रूपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. १९९६ साली केवळ एका शाखेद्वारे अतिशय अल्प अशा भांडवलावर सुरू झालेली अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक आज ६६५ कोटी ठेवींच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांत २१ कार्यरत शाखा व २ विस्तारित कक्ष अशा एकूण २३ शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना तत्पर व दर्जेदार बँकिंग सेवा देत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या केज, मुरूड व निलंगा या ठिकाणी बँकेच्या नवीन तीन शाखा अहवाल वर्षात कार्यरत झाल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांच्या आधीन राहूनच अंबाजोगाई पिपल्स बँक आजपर्यंत सर्व आर्थिक व्यवहार करीत आहे असे मोदी यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या सर्वांगिण प्रगती आणि विकासात बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी, सर्व संचालक श्री.वसंतराव चव्हाण, ऍड.विष्णुपंत सोळंके, पुरूषोत्तम चोकडा, सुरेश मोदी, ऍड.सुधाकर कराड, संकेत मोदी, शेख दगडू शेख दावल, सुधाकर विडेकर, प्रकाश लखेरा, हर्षवर्धन वडमारे, श्रीमती वनमाला रेड्डी, सौ.स्नेहा हिवरेकर, तज्ज्ञ संचालक सुनिल राजपुरोहित, तज्ज्ञ संचालक सचिन बेंबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे, बँकेचे सर्व सन्माननीय सभासद, ठेविदार, खातेदार, ग्राहक, हितचिंतक, बँकेचे सर्व अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारीवृंद व पिग्मी एजंट यांचे सातत्यपूर्ण सहकार्य व योगदान आहे. अशी माहिती चेअरमन मोदी यांनी दिली. अंबाजोगाई पीपल्स बँकेस आर्थिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचे दोन पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वस्तरांतून बँकेचे अभिनंदन व कौतुक होत आहे.


Categories

Recent Posts