Breaking

वीज पडून बैल ठार; चिंचोटी शिवारातील घटना

Updated: जून 9, 2026

By Vivek Sindhu

वीज पडून बैल ठार; चिंचोटी शिवारातील घटना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

वडवणी – वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या दरम्यान शेताच्या गोट्या बाहेर बांधलेल्या बैलावर रात्री 10 ते 11 च्या सुमारास विज पडली असून यामध्ये जागीच बैल ठार झाला असल्याची घटना चिंचोटी शिवारात घडली आहे.
रात्री वादळी वार्‍यासह विजेच्या कडकडाटात पावसाने जोरदार पावसाची हजेरी लावली. हा पाऊस जवळपास दहा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत झाला. चिंचोटी येथील रहिवासी असणारे शेतकरी अर्जुन गोंडे यांनी शेतातील गोट्याच्या बाहेर बांधलेल्या बैलावर रात्री दहा तेअकरा वाजण्याच्या सुमारास वीज पडली. यामध्ये बैल जागीच ठार झाला असून सदरील शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याची माहिती तात्काळ महसूल
प्रशासनाला दिल्यानंतर आज सकाळी गावचे तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामाकरून बैलाचा मृतदेह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. बैल दगावल्यामुळे सदरील शेतकर्‍याचे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान देखील झाले आहे. शेतकर्‍याला तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.


Categories

Recent Posts