Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाई शहरातील युवकांचा राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

Updated: नोव्हेंबर 10, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाई शहरातील युवकांचा राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नगर परिषद निवडणूकिच्या रणधुमाळीत शहरातील विविध परीसरातू अनेक युवकांचा राष्ट्रवादी पक्षात ओढा

अंबाजोगाई – अंबाजोगाई शहरातील बलुत्याचा मळा परिसरातील अनेक युवकांचा अंबाजोगाई शहरातील माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सोमवार दि 10 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्योतिराम कुरणे यांच्या माध्यमातून प्रवेश केलेल्यामध्ये सौदागर कुरणे, चंद्रकांत राऊत, सुभाष बलूतकर, रंगनाथ मुळे, शाकीर पठाण यांचा समावेश आहे.
अंबाजोगाई शहरात मागील अनेक वर्षांपासून राजकिशोर मोदी हे अंबाजोगाई नगर परिषदेच्या माध्यमातून शहरवासीयांची सेवा करत आहेत. गेली चाळीस वर्षांपासून अंबाजोगाई शहराचा विकास करून संपूर्ण शहरात राजकिशोर मोदी यांनी आपली पकड मजबुत केली आहे. ज्योतिराम कुरणे हे प्रभागातील विविध सामाजिक उपक्रमांतुन समाजसेवा करत आहे. त्यामुळे त्यांचा संपर्क देखील मोठया प्रमाणात आढळून येतो आहे.
गेली अनेक वर्षे केलेल्या कामाची शिदोरी म्हणूनच शहरातील लहान थोरांपर्यंतच्या मनामनामध्ये राजकिशोर मोदी हे घर करून आहेत. त्यामुळेच आजही अंबाजोगाई शहरातील अनेक युवक राजकिशोर मोदी यांच्यावर विश्वास ठेवत यांच्याकडे आकर्षिले जात आहेत. सध्या नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाची विचारधारा मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच प्रयत्नाच्या बळावर शहरातील विविध परिसरातील युवक तथा जेष्ठ व महिला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेकडे आकर्षिल्या जात आहेत.


Categories

Recent Posts