Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईतील ‘स्वाराती’ तील सुविधांचा खा.बजरंग सोनवणे घेणार आढावा

Updated: जानेवारी 17, 2026

By Vivek Sindhu

१९ जानेवारीला सर्व वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी राहणार उपस्थित

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

१९ जानेवारीला सर्व वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी राहणार उपस्थित

अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे रुग्णसेवा, आरोग्य सुविधा, मनुष्यबळ, औषध साठा, पायाभूत सुविधा तसेच प्रलंबित विविध प्रश्नांबाबत खा.बजरंग सोनवणे सविस्तर आढावा घेणार आहेत. सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बीड लोकसभा मतदारसंघाचे खा.बजरंग मनोहर सोनवणे यांच्या पुढाकारातून सदर बैठक आयोजित करण्यात येत असून, यासंदर्भात रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास पत्राद्वारे सूचनाही दिल्या आहेत. सदर बैठकीस संबंधित विभागप्रमुख, वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशासनातील जबाबदार अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार व वेळेवर आरोग्यसेवा मिळावी, रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात तसेच दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यात यावा, या उद्देशाने ही आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या बैठकीत रुग्णसेवेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्यात येणार असून, आरोग्य यंत्रणेमधील समन्वय अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. खा.बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यात, आरोग्य, शिक्षण, दळवळण अशा विषयांना कायम महत्व दिलेले आहे. आरोग्य विभागातील अडचणी सोडविण्यासाठी ते तत्पर असतात. जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रात देखील ते सरप्राईज व्हिजीट करत असतात. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क असते. जिल्ह्यातील रूग्णांना दर्जेदार उपचार, सुविधा मिळाव्यात यावर खा.बजरंग सोनवणे यांचा भर आहे.


Categories

Recent Posts