Breaking
Updated: नोव्हेंबर 13, 2025
ऐ.डी.फाउंडेशनचा महाराष्ट्र नारिशक्ती समाजरत्न पुरस्कार २०२५ अनिता ठाकूर यांना जाहीर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – अनुश्री धनश्री फाउंडेशन सांगली, यांच्या वतीने दरवर्षी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो.अनिता ठाकूर या स्वातंत्र्य सेनानी संग्रामसिंग चौहान यांच्या नातं व वामनराव ठाकूर यांच्या स्नुषा आहेत. त्यांना माहेरी, सासरी या दोन्हीकडे समाज कार्याचे बाळकडू मिळाले. त्यांनी ज्ञानप्रबोधिनी येथे प्रसाद चिक्षे,अभिजित जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालवाडी शिक्षिका म्हणून काम केले. त्या नंतर विमल मुंदडा यांच्या पारिवारिक संबंध तात आल्या त्या कालावधीत त्यांनी तहसिल अंतर्गत दक्षता समिती,स्वा.रा.ती. रुग्णालय अभ्यागत मंडळ,भ्रष्टाचार समिती अशा अनेक शासकीय, निमशासकीय समितीवर कार्य केले. तसेच स्वातंत्र्य सैनिक वसाहतीमध्ये विविध महिलांना एकत्र करून बचत गटाची स्थापना केली व त्या माध्यमातून महिलांना स्वबळावर उभे राहण्याची प्रेरणा मिळाली.आधारकार्ड, मतदानकार्ड,आयुष्मान भारत कार्ड इ.तात्काळ उपलब्ध होण्यासाठी अधिकारी,कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून ते उपलब्ध करून दिले. वसाहतीतील रहिवासी यांचे वाढदिवस अनाथाश्रम, अंधमूकबधिर शाळा आदी ठिकाणी साजरे करतात व ते साजरे करताना कपडे,खाऊ याचे वाटप केले जाते.छोट्या गोष्टीतून माणसं जोडणे,अडीअडचणी सोडवणे हा अनिता ताईंचा स्वभाव आहे.त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. एका गृहिणीला, सर्वसामान्य स्त्री चा खऱ्या अर्थाने सन्मान होत असल्याने अनिता ठाकुर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.