Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बाल लैंगिक अत्याचार खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

Updated: जानेवारी 23, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाई न्यायालयात ॲड. एम. बी. चव्हाण यांचा युक्तीवाद ठरला प्रभावी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई न्यायालयात ॲड. एम. बी. चव्हाण यांचा युक्तीवाद ठरला प्रभावी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2022 मध्ये दाखल झालेल्या बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) सारख्या गंभीर गुन्ह्यातून आरोपी अरविंद लोखंडे याची अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. एम. बी. चव्हाण यांनी केलेला प्रभावी युक्तीवाद आणि समोर आलेले तथ्य ग्राह्य धरून न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
2022 मध्ये अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन ठाण्यात अरविंद लोखंडे (रा. रायगड नगर, अंबाजोगाई) याच्या विरोधात कलम 363, 376, 376 (2) आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. संबंधित तपास अधिकार्‍यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर खटल्याची सुनावणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालय वर्ग 1 मध्ये पार पडली. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीदार आणि पुरावे तपासले गेले. मात्र, बचाव पक्षाचे वकील ड. एम. बी. चव्हाण यांनी कायद्याच्या चौकटीत राहून अतिशय प्रभावी मुद्दे उपस्थित केले. त्यांनी पुराव्यांमधील त्रुटी आणि विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले सबळ पुरावे सादर करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचे त्यांनी आपल्या युक्तीवादात मांडले.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद आणि उपलब्ध साक्षी-पुरावे तपासून न्यायालयाने आरोपी अरविंद लोखंडे याच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट केले. 21 जानेवारी 2026 रोजी न्यायालयाने आरोपीची या गंभीर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. या निकालामुळे कायदेशीर वर्तुळात अ‍ॅड. एम. बी. चव्हाण यांच्या अभ्यासू आणि तर्कसंगत युक्तीवादाचे विशेष कौतुक होत आहे.


Categories

Recent Posts