Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बीडमध्ये खड्डा खोदणाऱ्या मजुराचा गोळी झाडून खून

Updated: जानेवारी 6, 2026

By Vivek Sindhu

शहरात खळबळ,पोलीस घटनास्थळी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शहरात खळबळ,पोलीस घटनास्थळी

बीड : शहरात एका खड्डा खोदणाऱ्या मजुराचा गोळीबारात मृत्यू झाल्याने खबळ उडाली आहे, जुन्या वादातून झालेल्या गोळीबारातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र, गोळीबारानंतर आरोपी घटनस्थळावरुन फरार झाले आहेत. नगरपरिषदेत रोजंदारीवर काम करणारे कामगार हर्षद शिंदे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील अंकुश नगर परिसरात घडली. या गोळीबारात हर्षद यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे बीड शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील अंकुश नगर परिसरात नगरपरिषदेच्या वतीने खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला. गोळी लागल्याने हर्षद शिंदे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर आरोपी विशाल सूर्यवंशी हा पळून गेल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पंचनामा करण्यात आला असून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे बीड मधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Categories

Recent Posts