Breaking
Updated: जून 8, 2026
जुन्या वादातून तरुणावर चाकू हल्ला; देवपिंप्री येथे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: तालुक्यातील देवपिंप्री येथे जुन्या वादाची कुणकुण लागून एका शेतकऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६ जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर शेळके यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. फिर्यादी अनिल रामभाऊ गवारे (वय ३८) यांनी आरोपींना ‘माझ्या वडिलांना का मारले’ अशी विचारणा केली असता, या किरकोळ कारणावरून वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपी अभिषेक गणेश गवारे याने अनिल गवारे यांच्या डाव्या हाताच्या तळहातावर चाकू मारून गंभीर दुखापत केली, तर त्याचा साथीदार भक्तराज ज्ञानेश्वर शेळके याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी जखमी अनिल गवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ७ जून रोजी रात्री उशिरा गेवराई पोलीस ठाण्यात अभिषेक गवारे आणि भक्तराज शेळके या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील या हिंसक घटनेमुळे देवपिंप्री परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस शिपाई नवले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.