Breaking

आष्टी परिसरातील फत्तेवडगाव येथून विहिरीवरील नऊ सोलर पॅनलची चोरी

Updated: जून 8, 2026

By Vivek Sindhu

आष्टी परिसरातील फत्तेवडगाव येथून विहिरीवरील नऊ सोलर पॅनलची चोरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: तालुक्यात असणाऱ्या फत्तेवडगाव शिवारामधून एका शेतकऱ्याच्या विहिरीवरील सोलर पॅनल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. फत्तेवडगाव येथील रहिवासी आणि व्यावसायिक शेतकरी विनोद शिवाजी काळे (वय ३४) यांनी याप्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे. ही चोरी २ जून रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून ते ३ जून रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली असून, ७ जून रोजी या संदर्भात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी विनोद काळे यांचे फत्तेवडगाव शिवारात असणाऱ्या सर्वे नंबर १७३ मध्ये शेत आहे. या शेतातील विहिरीवर त्यांनी ‘शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड’ कंपनीचे नऊ सोलर पॅनल (प्लेटा) बसवले होते. अज्ञात चोरट्याने शेतात कोणी नसलेची संधी साधून हे नऊ सोलर पॅनल चोरून नेले. चोरीला गेलेल्या या सर्व पॅनलची अंदाजे एकूण किंमत १८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात शेती साहित्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर २६८/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार आहेर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts