Breaking
Updated: एप्रिल 21, 2026
जाब विचारला अन् तरुणावर विळ्याचा घाव घातला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी: तालुक्यातील डोईठाण येथे किरकोळ कारणावरून सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला धक्काबुक्की करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वर्षा रमेश खंडागळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शोभा जानू पाखरे, सुरज जानू पाखरे आणि गौतम कांबळे (सर्व राहणार डोईठाण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१८ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास डोईठाण येथे आरोपींनी संगणमत करून भांडण उकरून काढले होते. फिर्यादी वर्षा खंडागळे या भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता, आरोपींनी त्यांना हाताला धरून ढकलून दिले, ज्यामध्ये त्यांच्या हाताला जखम झाली. तसेच साक्षीदार राजेश खंडागळे आणि राहुल पाखरे यांना दगडाने मारहाण करून जखमी केले. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस हवालदार मुंडे पुढील तपास करत आहेत.