Breaking
Updated: एप्रिल 21, 2026
युसुफवडगाव हद्दीत घरफोडी आणि दुचाकी चोरी; लाखाचा ऐवज लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelयुसुफवडगाव: केज तालुक्यातील होळ आणि पळसखेडा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि दुचाकी असा एकूण १ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
हिंगावर व्यंकटराव शिंदे यांच्या घरात चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाटातील ६७ हजार रुपयांचे दागिने आणि रोख ४ हजार रुपये त्यांनी लांबवले. त्याच रात्री पळसखेडा येथून ऋषीकेश चव्हाण यांची ५० हजार रुपयांची दुचाकी (MH44AA8922) देखील चोरीला गेली. युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक माजरे तपास करत आहेत.