Breaking

राम कुलकर्णी यांची भारतीय जनता पक्षाच्या राज्य प्रवक्तेपदी फेरनिवड

Updated: एप्रिल 21, 2026

By Vivek Sindhu

कुलकर्णी यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

कुलकर्णी यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या नवीन कार्यकारिणीत राम कुलकर्णी यांची भाजपा राज्य प्रवक्तेपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. कुलकर्णी यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

पक्ष संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने, घोषित करण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणीत अनुभवी नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, ज्यामध्ये राम कुलकर्णी यांचा समावेश आहे. संघटनात्मक फेररचना आणि आगामी निवडणुकांसाठीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर कुलकर्णी यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्याला कारण ही तसेच आहे. राम कुलकर्णी हे यापूर्वीही भाजपाचे राज्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळत असून, शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्या विधानांना वेळोवेळी जशास तसे प्रत्युत्तर दिल्यामुळे कुलकर्णी हे चर्चेत आले होते. भाजपाने प्रदेश प्रवक्ता विस्तारित यादी जाहिर केली असून त्यात ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांची पुन्हा प्रदेश प्रवक्ता म्हणुन फेरनियुक्ती करण्यात आली. मागच्या 8 वर्षांपासून मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्रजी चव्हाण, ना.पंकजाताई मुंडे, महसूलमंत्री ना.बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवक्तेपदी काम करताना संघटनात्मक कार्य आणि पक्षाची बाजू माध्यमांकडे प्रभावीपणे मांडण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले. बीड जिल्ह्यातील ते ना.पंकजाताई यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यात आनंद व्यक्त होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 2019 साली प्रदेश प्रवक्ता म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. मागील 8 वर्षे प्रसारमाध्यमांत त्यांनी केलेले लिखाण इलेक्ट्रॉनिक मिडियासमोर मांडलेली बाजू एवढेच नव्हे तर विरोधकांवर तुटुन पडणारा, स्पष्ट वक्ता, परखड बोलणारा प्रवक्ता अशी त्यांची ओळख आहे. प्रदेश संघटनात्मक बदल झाल्यानंतर काही दिवसांपुर्वी प्रवक्ता पुनर्रचना प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यात विस्तारित प्रवक्ता यादी आज पुन्हा जाहिर करण्यात आली असून कुलकर्णी यांना प्रदेश प्रवक्ते म्हणुन पुन्हा घोषित करण्यात आल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाण यांनी काढले. राम कुलकर्णी हे पत्रकारितेच्या माध्यमातून तब्बल 33 वर्षांपासून बीड जिल्ह्याच्या समाजकारण आणि राजकारणात काम करतात. त्यांनी दिवंगत नेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे सोबत 30 वर्षे काम केले. पक्षाचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांतून परखड विचार मांडले, स्पष्टवक्तेपणा ठेवला आणि ठाम भूमिका घेतली. स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे पट्टशिष्य म्हणून विशेष ओळख आहे. राजकिय विश्लेषक म्हणून त्यांचे लिखाण नेहमीच चर्चेत असते. विविध क्षेत्रात त्यांची भरीव कामगिरी आहे. पत्रकारिता, शिक्षण, राजकारण, समाजसेवा आणि अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. एक वास्तववादी लिखाण करणारा पत्रकार ही पण त्यांची ओळख आहे. सध्या ते उज्जैन (इंदौर) येथे भाजपाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी आहेत. तिथे त्यांना त्यांच्या फेरनिवडीची माहिती प्राप्त झाली. प्रवक्तेपदी नांव घोषित होताच भाजपाचे राष्ट्रीय, राज्य, विभागीय आणि जिल्हा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रमुख नेते, मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ते भारतीय जनता पक्ष अशी राजकीय वाटचाल करताना, विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी घेतलेला विधायक पुढाकार या दरम्यान पुन्हा एकदा प्रवक्तेपदी पक्ष नेतृत्वाने मला संधी देवून माझ्यावर जो विश्वास टाकला. तो आपल्या कामातून सेवाभाव वृत्तीने पुढे जाताना सार्थ करून दाखवू असे राम कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

ना.पंकजाताई यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते :
बीड जिल्ह्यात पक्षाचे काम करीत असताना राम कुलकर्णी हे ना.पंकजाताई यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मागील अनेक वर्षांपासून ते मुंडे कुटुंबियांचे निष्ठावंत सहकारी आहेत.‌

पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरविणार :
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण, ना.पंकजाताई मुंडे, महसूलमंत्री ना.बावनकुळे साहेब, माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, आमदार सौ.नमिताताई मुंदडा, जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्यासह बीड जिल्ह्यातील भाजपाचे सर्व सन्माननीय आमदार, माजी आमदार, माजी खासदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी माझ्या पक्ष कार्यावर जो विश्वास दाखवून माझी फेरनिवड केली‌. त्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे जाहीर आभार व्यक्त करून माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरविणार आहे असे नवनियुक्त भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सांगितले.


Related Posts :

Categories

Recent Posts