Breaking
Updated: एप्रिल 10, 2026
तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारूर: मुलाच्या कामावरून विचारणा केल्याच्या कारणावरून दोन आरोपींनी वडिलांना दगडाने मारून जखमी केल्याची घटना मुन्नानाईक तांडा, उमरेवाडी येथे घडली आहे.
फिर्यादी सुनील बाबुराव राठोड (वय ४०) घरी असताना आरोपी नितेश सुभाष पवार आणि सुभाष चापसिंग पवार हे त्यांच्याकडे आले. त्यांनी सुनील यांचा मुलगा सुशील याच्याबद्दल विचारणा केली. सुनील यांनी “काय काम आहे ते सांगा, मग मी सांगेन” असे म्हणताच आरोपी नितेश याने खाली पडलेला दगड सुनील यांच्या डाव्या डोळ्यावर मारून त्यांना जखमी केले. तसेच आरोपी सुभाष याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या साक्षीदारालाही आरोपींनी धक्काबुक्की केली व सुनील आणि त्यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. धारूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार मस्के तपास करत आहेत.