Breaking
Updated: मार्च 10, 2026
दत्तात्रय बिक्कड यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- केज पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बिक्कड यांन पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बिक्कड यांना पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.
त्या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या स्वाक्षरीनिशी आदेश निर्गमित झाला आहे. केज पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मांजरमे, पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने यांच्या उपस्थितीत प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी त्यांना स्टार लावून अभिनंदन केले. यावेळी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या पदोन्नती बद्दल त्यांचे सहकारी, मित्रमंडळी आणि नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.