Breaking
Updated: मार्च 5, 2026
केज-कळंब रोडवर एसटी बसचा भीषण अपघात; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज-कळंब मार्गावरील चिंचोली पाटीजवळ आज पहाटे सहाच्या सुमारास उभ्या ट्रकला एसटी बसने जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. कोल्हापूरहून माजलगावच्या दिशेने जाणारी बस रस्ता ओलांडताना हॉटेल लालपरी जवळ उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात बस चालक आनंद गायके आणि वाहक विष्णू तांबडे यांच्यासह अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक जय जोगदंड आणि पोलीस हवालदार राजू वंजारे यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक सुमित तेलंग यांनी सर्व जखमींना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये संजय खरात, चैतन खरात, भास्कर गायकवाड, आशा खरात, सचिन खरात, रोशनी खरात, भाग्यश्री गायकवाड, पायल गायकवाड, सुनिता खरात, सचिन सुरवसे आणि वैशाली राऊत यांचा समावेश आहे. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक राकेश बनसोडे यांनी अपघातस्थळाची पाहणी केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.