Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मोबाईल घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा

Updated: फेब्रुवारी 2, 2026

By Vivek Sindhu

मोबाईल घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: तालुक्यातील वाणटाकळी येथे घरासमोर गुरांना चारा टाकत असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन तरुणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात विनयभंग आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, वाणटाकळी परिसरात पीडित मुलगी आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास आहे. २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पीडितेचे पालक कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यावेळी मुलगी घरासमोर गुरांना चारा टाकत असताना सोपान रामदास खोडवे (रा. येल्डा) आणि प्रवीण पिंटू हेगडकर (रा. ममदापूर) हे दोघे दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी मुलीला अडवून ‘तू आमच्याशी का बोलत नाहीस?’ अशी विचारणा केली आणि सोबत आणलेला मोबाईल जबरदस्तीने तिला देण्याचा प्रयत्न केला.

पीडितेने मोबाईल घेण्यास नकार दिला असता, प्रवीणने तिचा विनयभंग केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपींनी तिला ‘जर ही बाब कोणाला सांगितली तर तुला उचलून नेऊ किंवा जिवे मारून टाकू’ अशी धमकी दिली. पीडितेचा आवाज ऐकून तिची मावशी घटनास्थळी धावून आली, त्यांना पाहताच दोन्ही आरोपी दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर पीडितेने घाबरलेल्या अवस्थेत सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला आणि पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी सोपान रामदास खोडवे आणि प्रवीण पिंटू हेगडकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Categories

Recent Posts