Breaking

स्कॉर्पिओच्या धडकेत ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Updated: जानेवारी 22, 2026

By Vivek Sindhu

स्कॉर्पिओच्या धडकेत ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: बीड शहरातील दत्त मंदिर गल्ली परिसरात एका भरधाव स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत ४२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप मयताच्या वडिलांनी केला आहे.

सावतामाळी चौक बीड येथील ६७ वर्षीय अशोक श्रीरंग बाबर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. २० जानेवारी २०२६ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सुभाष रोडवरील दत्त मंदिर गल्लीत हा अपघात झाला. आरोपी ओमकार अंगद दुनघव, राहणार पालवन सध्या राहणार शाहूनगर बीड, याने आपली स्कॉर्पिओ (क्रमांक एम.एच.१३- बी.एन.७१५५) बेदरकारपणे चालवून गणेश अशोक बाबर यांना जोराची धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे ४२ वर्षीय गणेश बाबर यांचा मृत्यू झाला. बीड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार आघाव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts