Breaking
Updated: जानेवारी 12, 2026
ग्रामसेवकाच्या कामात अडथळा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelचकलांबा – शिरूर कासार तालुक्यातील मातोरी शिवारातील विहरीवरील तीन सोलार मोटर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवार (दि.८) रोजी घडली असून एकूण १,०९,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत असून चोरट्यांनी आता आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळवला आहे. शिरूर कासार तालुक्यातील मातोरी येथील शेतकरी आसाराम दिनकर जरांगे (वय ४७) यांच्या गट क्र.३६४,३६५ व ४१६ या शेतातील विहरीवरील लावलेल्या तीन सोलार मोटारी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवार (दि.८) रोजी संध्याकाळी ७ ते शुक्रवार (दि.९) रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली असून एकूण १,०९,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध आसाराम जरांगे यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात रविवार (दि.११) रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाअसून पुढील तपास पोलीस करत आहेत.