Breaking
Updated: जानेवारी 10, 2026
ग्रामसेवकाच्या कामात अडथळा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने बनसारोळा येथे छापा मारून तीन हजार चारशे रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त केली.
बनसारोळा (ता. केज) येथे डिसीसी बँकेच्या जवळ असलेल्या पत्र्याच्या शेडच्या मागे मोकळ्या जागेत एक इसम हा विना परवाना देशी, विदेशी दारूची राजरोसपणे विक्री करीत असल्याच्या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकातील जमादार विकास चोपणे, बालासाहेब डापकर, राजू गुंजाळ, चंद्रकांत काळकुटे यांनी ९ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता छापा मारला. पोलिसांनी सुनिल छबु गायकवाड (रा. बनसारोळा) यास रंगेहाथ पकडून त्याच्या ताब्यातील दोन हजार पाचशे रुपयांच्या देशी दारूच्या ५० बाटल्या व नऊशे रुपयांच्या देशी दारूच्या तीन बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी छबु गायकवाड विरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.