Breaking
Updated: जानेवारी 6, 2026
अंबाजोगाईच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई नगरपरिषदेमध्ये लोकविकास महाआघाडीच्या तिकिटावर व राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक २० नगरसेवक निवडून आले. निवडून आलेल्या नगरसेवकांमधून सय्यद ताहेरभाई यांची अंबाजोगाई नगरपरिषद लोकविकास महाआघाडीच्या गटनेतेपदी सर्वांनूमते निवड करण्यात आली.
मंगळवार, दिनांक ०६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत सय्यद ताहेरभाई यांच्या गटनेतेपद निवडीचे पत्र लोकविकास महाआघाडीच्या वतीने त्यांना सादर करण्यात आले. यावेळी लोकविकास महाआघाडीचे प्रमुख राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.विष्णुपंत सोळंके, बबनराव लोमटे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक हाजी इस्माईल हिरू गवळी, दिनेश मोतीलाल भराडिया, महेश बाळासाहेब कदम, महेश बालासाहेब लोमटे, ऍड.विकास रामकृष्ण काकडे, मालू भगवान जोगदंड, आकाश जिवनराव कराड, राजपाल संभाजी जावळे, नजीर उमरदराजखान पठाण, सौ.जयश्रीताई पृथ्वीराज साठे, सौ.दिपाताई बबन ऊर्फ दाजीसाहेब लोमटे, शेख शमीम शेख रहीम, बशीरा शफीक सय्यद, नाजनीन बेगम अकबरखाँ पठाण, शेख शिरीन अशफाक, सौ.श्रुतीताई अमोलराव लोमटे, सौ.संगिताताई दाजीसाहेब लोमटे, सौ.रेखाताई विलास जाधव, सौ.सोनीताई दत्तात्रय सरवदे हे लोकविकास महाआघाडीचे सर्व २० नगरसेवक आणि दाजीसाहेब लोमटे, अमोल लोमटे, अकबरभाई पठाण, सचिन जाधव, ऍड.अनिल लोमटे, जफरभाई शेख, रौफभाई बिल्डर हे उपस्थित होते. यावेळी राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, बबनराव लोमटे व सर्व नगरसेवकांनी सय्यद ताहेरभाई यांचे अभिनंदन करून आगामी काळात अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम व संबंधित नियमानुसार गटनेतेपदाची निवड :
लोक विकास महाआघाडीच्या नवनिर्वाचित सर्व २० नगरसेवकांनी एकत्रित येत सर्वानुमते नगरपरिषदेत महाआघाडीचा अधिकृत गट स्थापन केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना लेखी पत्र देण्यात आले असून गट स्थापन करण्याबाबत व गटनेता निवडीचा ठराव व त्याबद्दलचे इतिवृत्त सादर करण्यात आले आहे. लोक विकास महाआघाडीच्या गटनेतेपदी सय्यद ताहेरभाई यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडपत्राच्या अनुषंगाने गट स्थापन करून गटनेता निवड केल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आज रोजी देण्यात आले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम व संबंधित नियमानुसार या गटाची अधिकृत नोंद घेण्यात यावी, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. अंबाजोगाई शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास हा आपला नेहमीचा मानक असून यासाठी जबाबदारी देताना सामाजिक अभिसरण व ज्येष्ठ व नव्या प्रतिनिधीची सांगड घालण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याच अभिसरण व समीकरणात माझे सहकारी सय्यद ताहेरभाई यांची नगरपरिषद गटनेता म्हणून निवड करण्यात आली.
~ राजकिशोर मोदी
(प्रमुख, लोकविकास महाआघाडी, अंबाजोगाई.)