Breaking

जनतेचा सेवक अंबाजोगाईच्या नगराध्यक्षपदी विराजमान!

Updated: जानेवारी 5, 2026

By Vivek Sindhu

IMG 20260105 WA0096

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नंदकिशोर मुंदडा यांनी स्वीकारला पदभार; रमाई आवास योजनेच्या धनादेशावर स्वाक्षरी करून कारभारास सुरुवात

अंबाजोगाई: गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असूनही सत्तेच्या पदांपासून दूर राहिलेले जनसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी सोमवारी, ५ जानेवारी २०२६ रोजी अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार रितसर स्वीकारला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अंबाजोगाईकरांनी शहरात जनसागराची प्रचिती दिली. पदभार स्वीकारल्यानंतर मुंदडा यांनी सर्वप्रथम रमाई आवास योजनेच्या हप्त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करून आपल्या कारभाराचा श्रीगणेशा केला, ज्यातून त्यांनी सामान्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत.

img 20260105 wa01436385800353563961375

या पदग्रहण सोहळ्यानिमित्त ‘शहर परिवर्तन जनविकास आघाडी’च्या वतीने शहरात भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. अक्षय निवासस्थानापासून सुरू झालेली ही मिरवणूक मोंढा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, योगेश्वरी देवी मंदिर, बस स्थानक मार्गे नगरपालिकेत पोहोचली. दोन तासांचा नियोजित मार्ग कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पार करण्यासाठी पाच तास लागले. उघड्या जीपमध्ये बसलेल्या नंदकिशोर मुंदडा यांना ठिकठिकाणी क्रेनच्या साहाय्याने हार घालण्यात आले, तर जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. महिलांनी मुंदडा यांचे औक्षण करून स्वागत केले. या मिरवणुकीत परिवर्तन आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते ढोल-ताशांच्या गजरात बेभान होऊन सहभागी झाले होते. ही मिरवणूक म्हणजे नंदकिशोर मुंदडा यांच्यावरील अंबाजोगाईकरांच्या प्रेमाचा महापूरच ठरली. त्यानंतर नगर पालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये झालेल्या मुख्य सोहळ्यात मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांनी मुंदडा यांचे स्वागत करून पदभार सुपूर्द केला. ज्यांनी आयुष्याची उमेदीची वर्षे पदाची अपेक्षा न ठेवता जनतेसाठी झिजवली, ते ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा जेव्हा नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले, तेव्हा हा केवळ एका राजकीय पदाचा सोहळा न राहता अंबाजोगाईकरांच्या कृतज्ञतेचा उत्सव ठरला. याप्रसंगी जनविकास परिवर्तन आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे स्वागत देखील नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. या सोहळ्याने अंबाजोगाईच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

img 20260105 wa01526478464972082569498

शहर विकासासाठी प्रशासन सज्ज
नगरपालिकेत एका नव्या युगाला सुरुवात होत असून प्रशासन आणि नगराध्यक्ष हे रथाच्या दोन चाकांप्रमाणे एकत्रितपणे शहराच्या विकासाचा गाडा पुढे नेतील. नगर पालिका प्रशासनाकडून नगराध्यक्षांना पूर्ण सहकार्य राहील असे मुख्याधिकारी प्रियांका टोंगे म्हणाल्या.

पारदर्शक कारभार व्हावा : अक्षय मुंदडा
याप्रसंगी बोलताना युवा नेते तथा पन्नगेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अक्षय मुंदडा यांनी प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या. अंबाजोगाई नगरपालिका राज्यात प्रथम क्रमांकावर यावी, कर वसुलीत पारदर्शकता असावी, मासिक बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण व्हावे आणि दरमहा प्रभागात जनता दरबार भरवून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण व्हावे, अशा सूचना त्यांनी केल्या. भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले.

प्रत्येक नागरिकाला सन्मान मिळेल : नंदकिशोर मुंदडा
नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या भाषणात अंबाजोगाईकरांचे आभार मानताना भावनिक उद्गार काढले. ते म्हणाले की, ही माझ्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची संधी असून मी माझ्या नावावर कोणताही डाग लागू देणार नाही. ‘गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट’ या सूत्रावर कर्मचारी आणि नगरसेवकांनी काम करावे, असे सांगतानाच त्यांनी स्पष्ट केले की, आपण स्वतःचे सर्व कर आधी भरणार असून त्यानंतरच नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करणार आहोत. समर्थक असो वा विरोधक, प्रत्येकाचे काम नियमानुसार आणि सन्मानाने केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

img 20260105 wa0114350012873601325274
img 20260105 wa01314933471390723889197
20260105 1355023966951007064926686
img 20260105 wa00893791150682146329599
img 20260105 wa00921189930176358429049
img 20260105 wa01008832993809149677601
img 20260105 wa01019201310309771108379
img 20260105 wa01223622845328960938303
img 20260105 wa01177813616511572722716
img 20260105 wa01181779640844642190761
img 20260105 wa01326645347360544792474

Categories

Recent Posts