Breaking
Updated: जानेवारी 5, 2026
मंगेश सुरवसे यांची नर्सेस फेडरेशनच्या कार्याध्यक्ष पदी निवड
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)- येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयव रुग्णालयात कार्यरत असलेले परिचारक मंगेश सुरवसे यांची महाराष्ट्र महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या कार्यकारी कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
दिनांक ३ व ४ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन, महाराष्ट्र राज्य ची २० वी राज्यव्यापी सुवर्ण महोत्सव परिषद घेण्यात आली. त्यामध्ये कार्यकारी कार्याध्यक्षपदावर मंगेश सुरवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातील तमाम परिचारिका बंधू भगिनी, सर्व पदाधिकारी, सर्व राज्य पधादिकारी यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मंगेश सुरवसे यांनी आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान मंगेश सुरवसे यांचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, उप अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, सर्जरी विभाग प्रमुख डॉ. नितीन चाटे, नेत्र विभाग प्रमुख डॉ. ज्ञानोबा दराडे, रुग्णालय अधिक्षक डॉ. राकेश जाधव व नर्सेस फेडरेशनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.