Breaking
Updated: जानेवारी 3, 2026
सत्कार सावित्रीमाईंच्यालेकींचा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई- दि. ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा जन्मदिन. जयंती निमित्त एकता मैत्री फाउंडेशन,अंबाजोगाई यांच्या वतीने जि.प.प्रा.शाळा, दस्तगीरवाडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शैक्षणिक क्षेत्रात काम करत असलेल्या स्थानिक महिलांचा फेटा बांधून,पेन देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच सर्व शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.औताडे मॅडम, अंगणवाडी शिक्षिका सौ.आशा माने मॅडम,अंगणवाडी मदतनीस सौ.संगीता चोपने,आशा वर्कर सौ.उषा माने ,सौ कौशल्या घाडगे,सौ.सरिता चोपणे तसेच शिक्षक श्री.चव्हाण सर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित ग्रा.पं.स.श्री.धीरज घाडगे श्री.श्रीकांत खुणे सर व एकता मैत्री फाऊंडेशन सदस्य श्री प्रदीप चोपने,पद्माकर साळे व गावातील महिला व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रदीप चोपने यांनी बोलत असताना एकता मैत्री फाऊंडेशन च्या कार्याचा उल्लेख केला व येणाऱ्या काळात ही शाळेला मदत करण्यासाठी एकता मैत्री फाऊंडेशन तत्पर असेल असे सांगितले. मुख्याध्यापिका सौ.औताडे मॅडम यांनी एकता मैत्री फाऊंडेशनच्या कामांचे कौतुक केले. श्री.चव्हाण सर यांनी सर्वांचे आभार मानले.