Breaking
Updated: डिसेंबर 22, 2025
नागनाथ वारद यांचे निधन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – गेली अनेक वर्षांपासून विविध दैनिकात काम करणारे पत्रकार नागनाथ वारद यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
शालेय जीवनापासून नागनाथ वारद हे आपल्या मित्र परिवारात एक ऍक्टीव्ह पर्सन म्हणून ओळखले जायचे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर नागनाथ वारद सामाजिक कार्यासोबतच पत्रकारितेचे वळले. गेली अनेक वर्षे त्यांनी विविध जिल्हा व विभागीय दैनिकात अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले.
गेली अनेक महिन्यांपासून नागनाथ वारद हे विविध व्याधिंनी त्रस्त झाले होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत होती. अखेर २१ डिसेंबर रोजी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज २२ डिसेंबर रोजी नागनाथ वारद यांचे पार्थिवावर बाराखांबी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आप्तेष्ट, मित्रपरिवार व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.