Breaking
Updated: डिसेंबर 18, 2025
जनसामान्यांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रभागातून तरुण आणि डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे महेश कदम यांना मतदारांचा जबरदस्त जनाधार मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. एका कॉलवर मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या कदम यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, प्रभागातील घराघरात त्यांचे नाव पोहोचले आहे.
महेश कदम यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः तरुणांचे मोठे संघटन त्यांच्या पाठीशी उभे असून, गणेश मंडळाच्या माध्यमातून त्यांनी राबविलेले विविध सामाजिक उपक्रम नागरिकांच्या स्मरणात आहेत. केवळ उत्सवच नव्हे, तर प्रभागातील अडीअडचणीत असलेला कोणताही नागरिक असो, महेश कदम हे स्वतः जातीने तिथे हजर राहून मदत करतात. यामुळेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गातही त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. त्यांच्या प्रत्येक कॉर्नर बैठक, प्रचार फेरीला प्रभागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महेश कदम यांच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा नागरिकांना भावत असून दिवसागणिक त्यांचा जनाधार वाढत आहे
यावेळच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांनी एक महत्त्वाचा निर्धार केला आहे. ‘आपल्या प्रभागातील आणि आपल्या हक्काचा’ उमेदवारच पालिकेत जावा, अशी भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. महेश कदम हे याच भागात वास्तव्यास असल्याने ते कोणत्याही क्षणी मदतीला धावून येतात. त्यांचा विनम्र स्वभाव आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची निडर वृत्ती यामुळे त्यांना ‘कुटुंबातील सदस्य’ म्हणून पाहिले जात आहे. महेश कदम हे देखील मतदारांना तुमच्या अडचणीत सदैव मदतीला उभा असेल अशी ग्वाही देत आहेत. कदम यांनी प्रभागातील स्वच्छता, पाणीपुरवठा, अंडरग्राउंड नाल्या यासाठी प्रध्नय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासोबतच नागरिकांना नगर पालिकेशी निगडीत सर्व प्रशासकीय कामांमध्ये सुलभता कशी मिळेल याकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही सांगितले आहे.
राजकीय गणितांचा विचार करता, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे खंबीर समर्थक म्हणून महेश कदम ओळखले जातात. कदम यांच्या प्रचारासाठी राजकिशोर मोदी आणि तरुण नेते संकेत मोदी यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कदम यांचा झंझावाती प्रचार सुरु आहे. दिवसागणिक वाढणारा लोकाश्रय पाहता, यंदाच्या निवडणुकीत महेश कदम हे अंबाजोगाई शहरात सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येतील, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.