Breaking
Updated: डिसेंबर 10, 2025
योगेश्वरी शिक्षण संस्थेत अग्नि वीरांचा सन्मान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelयोगेश्वरी शिक्षण संस्थेत अग्नि वीरांचा सन्मान
अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय व योगेश्वरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या दहा कॅडेट्सची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून नियुक्ती झाली . त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रसंगी अग्निवीर म्हणून नियुक्ती झालेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या कांही कॅडेटसनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंगेश जाधव,
तसेच पालक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात योगेश्वरी सैनिकी शाळेचे प्राचार्य मेजर प्रा. एस. पी. कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कांही उदाहरणे देऊन
सैनिकी सेवेत जास्तीत जास्त तरुणांनी गेले पाहिजे राष्ट्र निर्माणात महत्वाची भूमिका वठविता येते. संस्था अशा विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देते असे मत व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्र सेवेत दाखल होवून आई- वडीलांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. त्यांनी अग्निवीर म्हणून नियुक्ती झालेल्या कॅडेट्सना शुभेच्छा दिल्या.
योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर यांनी भारतीय सैन्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.पालकांनी मोठ्या मनाने आपल्या पाल्याला भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी परवानगी दिली त्यांचा हा त्याग समजून घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले.
योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनातून यशस्वी कॅडेट्सचे अभिनंदन केले. जगातील कांही क्रांतीच्या घटना ऊसाच्या फडातून घडून आलेल्या आहेत. भारतीय सैन्यात निवड झालेले आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या कष्टाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, ऊसाच्या फडात काम करुन आई-वडिलांचे स्वप्न साकार करत आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी लेफ्टनंट पी. डी. शिंपले यांनी केले तर आभार प्रदर्शन कॅडेट पियुष गोरे याने केले.या प्रसंगी अग्निवीर म्हणून निवड झालेल्या मंगेश जाधव याने आपले मनोगत व्यक्त केले तसेच पालक आप्पाराव जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. कानेटकर, राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी लेफ्टनंट डॉ. राजकुमार थोरात, उपप्राचार्य डॉ रमेश सोनटक्के, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी मंडळाचे प्रमुख डॉ. गंगाधर आकलोड, हिंदी विभाग प्रमुख डॉ. राम बडे, महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. पी. सी. गादेकर, इतिहास विभाग प्रमुख प्रा. महेंद्र देशपांडे राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.