Breaking

अंबाजोगाईतील चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण

Updated: नोव्हेंबर 26, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाईतील चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

लोकविकास महाआघाडीला कपबशी, जनविकास आघाडीला छत्री

अंबाजोगाई : नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया आज विलासराव देशमुख सभागृहात पार पडली. नगराध्यक्ष पदावर नंदकिशोर मुंदडा आणि राजकिशोर मोदी हे दोन प्रमुख उमेदवार आघाड्यांमार्फत निवडणूक लढवत असल्याने कोणाला कोणते चिन्ह मिळणार याकडे शहरभर लक्ष लागले होते.

चिन्ह वाटप कार्यक्रमाला निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे आणि मुख्याधिकारी प्रियांका टोंगे उपस्थित होते. दोन्ही प्रमुख आघाड्यांनी कपबशी या चिन्हाला प्रथम प्राधान्य दिल्याने निर्णयासाठी लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यात राजकिशोर मोदी यांच्या लोकविकास महाआघाडीला कपबशी हे चिन्ह प्राप्त झाले. नंदकिशोर मुंदडा यांच्या शहर परिवर्तन जनविकास आघाडीने द्वितीय प्राधान्य दिलेली छत्री ही निशाणी त्यांना मिळाली.

चिन्ह वाटपानंतर दोन्ही आघाड्यांचा प्रचार आणखी गती घेणार आहे. प्रचार मोहिमेची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत असून मतदान 2 डिसेंबरला होणार आहे.
चिन्ह वाटप पूर्ण झाल्याने उमेदवारांनी आता प्रचार मोहीम वेगाने सुरू करण्याची तयारी केली आहे. शहरात निवडणूक वातावरण रंगत असून, बॅनर, पोस्टर, घर भेटी आणि सभांच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचू लागले आहेत. प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.


Categories

Recent Posts