Breaking

अंबाजोगाई शहरामधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करण्यासाठी संकेत मोदी यांच्या संकल्पनेतून व राजकिशोर मोदी यांच्या दूरदृष्टीतून निर्माण होणार उत्तम संधी

Updated: नोव्हेंबर 25, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाई शहरामधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करण्यासाठी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई शहरामधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करण्यासाठी युवा नेते संकेत मोदी यांच्या संकल्पनेतून व अनुभवी नेतृत्व राजकिशोर मोदी यांच्या दूरदृष्टीतून आगामी काळात शहरात उत्तम संधी निर्माण होणार आहेत. नवी दिशा… आणि नवा दृष्टिकोन घेवून पापा मोदी आपल्या युवा समर्थकांसह प्रयत्नशिल आहेत.

युवा नेते संकेत मोदी यांच्या संकल्पनेतून व अनुभवी नेतृत्व राजकिशोर मोदी यांच्या दूरदृष्टीतून आगामी काळात शहरात उत्तम संधी निर्माण होणार आहेत. अंबाजोगाईतील सर्व वयोगटातील मुले, मुली आणि क्रीडा प्रेमींसाठी युवा नेतृत्व संकेत भैया मोदी यांच्या आधुनिक संकल्पनेतून व राजकिशोर मोदी यांच्या दूरदृष्टीतून उत्तम संधी निर्माण करणाऱ्या अनेक उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. यामध्ये आधुनिक पद्धतीचे इंडोअर स्टेडियम आणि आउटडोअर क्रीडा प्रशिक्षण केंद्र ही आमची मूलभूत प्रकल्पे आहेत. अंबाजोगाईच्या तरूण, तरूणींना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून, शहरातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळवून देण्याचा मोदींचा विधायक प्रयत्न आहे. अंबाजोगाई शहरात विविध इंडोअर खेळांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून, त्यामध्ये बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, स्केटिंग रिंग, जिम्नॅस्टिक्स यांसारख्या खेळांसाठी ३,००० प्रेक्षक क्षमतेचे भव्य इनडोअर स्टेडियम तसेच खेळाडूंकरिता आधुनिक, सुरक्षित आणि स्मार्ट क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहरात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, ऍथलेटिक्स आणि इतर मैदानी खेळांसाठी, स्वतंत्र क्रीडा परिसर तयार करण्यात येईल, ज्यामध्ये विविध क्रीडा प्रकारांसाठी केवळ गुणवत्तापूर्ण क्रीडांगणांच नव्हे, तर प्रशिक्षण सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातील. हे विशेष होय.

अंबाजोगाईतील प्रत्येक तरूण, तरूणींना उत्कृष्ट क्रीडा संधी निर्माण करून देऊन अंबाजोगाई शहराचे नांव देश-विदेश पातळीवर नेऊन प्रत्येक क्रीडाप्रेमींच्या आयुष्यात प्रगतीची नवी दिशा देणे, हाच मोदींच्या या व्हिजनचा मुख्य उद्देश आहे. या अत्याधुनिक सुविधामुळे शहरातील तरूण-तरूणींना उत्तम आरोग्य प्राप्त होऊन क्रीडा संस्कृती मजबूत होईल व अंबाजोगाई शहरा मधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील. या करिता आउटडोअर स्पोर्ट्स ट्रेनिंग फॅसिलिटी म्हणजेच पुढील प्रमाणे उपलब्ध सुविधा निर्माण करून देण्याचा मोदींचा प्रामाणिक उद्देश आहे. म्हणून स्वतंत्र व क्रीडा परिसर, स्मार्ट व आधुनिक क्रीडा साहित्य, भव्य आणि मानक आकाराचे मैदान क्रिकेट, फुटबॉल व एथलेटिक्ससाठी स्वतंत्र झोन्स, त्याकरिता अनुभवी प्रशिक्षकांची मार्गदर्शन सुविधा ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राजकिशोर (पापा) मोदी यांचे मानने आहे की, एखाद्या शहराचा विकास केवळ रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा किंवा दिवाबत्तीपुरता मर्यादित नसतो. एका शहराची खरी प्रगती तिथल्या तरूणांना मिळणाऱ्या आरोग्य व क्रीडा विषयक सोयी, सुविधा आणि संधींवर, आर्थिक स्थैर्यावर आणि व्यवस्थापनाच्या दर्जावर अवलंबून असते. या सर्व घटकांचा समन्वय साधत अंबाजोगाईला संपूर्ण विकसित शहर बनविण्याचा प्रयत्न राजकिशोर मोदी यांनी सातत्याने केला आहे. नगरपालिकेचे प्रशासन त्यांच्या हातात असताना त्यांनी शहरातील मूलभूत पायाभूत सुविधांवर बारकाईने काम केले. स्वच्छता मोहिमा प्रभावीपणे राबाविल्या, पाणीपुरवठा सुधारला, दिवाबत्तीची व्यवस्था मजबूत केली आणि शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यास प्राधान्य दिले. एक सक्षम, शिस्तबद्ध आणि विकासाभिमुख नगरपालिका कशी असावी याचे उदाहरण त्यांनी प्रत्यक्ष कामाद्वारे घालून दिले. या सर्व सेवाकार्यात आता त्यांचा मुलगा संकेत यांची ही साथ मोदी यांना मिळत आहे. संकेत मोदी यांचे आधुनिक व्यवस्थापन, अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि स्थिर धोरणे यांच्या माध्यमातून अंबाजोगाईकरांसाठी विविध क्षेञात नवीन संधी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अंबाजोगाईतील तरूणांच्या हातात आरोग्य व खेळाची गुरूकिल्ली देत त्यांचे आयुष्य बदलण्याचे मोठे सामाजिक काम राजकिशोर मोदी यांना करावयाचे आहे. शहराच्या विकासदृष्टीला आर्थिक बळ देत, अनेक कुटुंबांना उभारी देत त्यांनी अंबाजोगाईचे भविष्य मजबूत करण्याची भूमिका पार पाडली. याच कामगिरीच्या आधारावर शहरातील जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आजही दृढ विश्वास असून त्यांचे नेतृत्व अंबाजोगाईच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे नागरिकांचे ठाम मत आहे.


Categories

Recent Posts