Breaking
Updated: नोव्हेंबर 20, 2025
लोक विकास महाआघाडीचे बळ वाढले ; समाजवादी पार्टीचा जाहीर पाठिंबा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपापा मोदींच्या नेतृत्वाला अंबाजोगाईकरांची पसंती – ऍड.शिवाजी कांबळे
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोक विकास महाआघाडीला बुधवारी मोठा राजकीय हातभार मिळाला आहे. समाजवादी पार्टीने पत्रकार परिषद घेऊन लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी व महाआघाडीच्या नगरसेवकपदासाठी उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे लोक विकास महाआघाडीचे बळ वाढले आहे. पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पार्टीचे लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांनी जाहीर आभार मानले आहेत. तर भाजप समर्थक विरोधकांच्या कोणत्याही भुलथापांना बळी न पडता सुज्ञ मतदारांनी लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी व सर्वच प्रभागातील नगरसेवकपदाच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन समाजवादी पार्टीच्या वतीने अंबाजोगाईतील सर्व सुजाण जनतेला करण्यात आले आहे.
अंबाजोगाईत बुधवार, दिनांक १९ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव तथा चर्मकार सेलचे प्रदेशाध्यक्ष ऍड.शिवाजी कांबळे यांनी सांगितले की, पापा मोदींच्या नेतृत्वाला अंबाजोगाईकरांची नेहमीच पसंती मिळाली आहे. अंबाजोगाईचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जनतेला पुन्हा एकदा पापा मोदी हेच नगराध्यक्ष म्हणून हवे आहेत. आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोक विकास महाआघाडीला जाहीर पाठिंबा देत आहोत. असे ऍड.कांबळे म्हणाले. तर यावेळी बोलताना समाजवादी पार्टीचे अंबाजोगाई शहराध्यक्ष राजेश परदेशी यांनी सांगितले आहे की, लोक विकास आघाडीवर अंबाजोगाईकरांचा मोठा विश्वास आहे. कारण, याचे नेतृत्व राजकिशोर पापा मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे आणि समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव तथा चर्मकार सेलचे प्रदेशाध्यक्ष ऍड.शिवाजी कांबळे हे सर्व जण करीत आहेत. आम्ही पुढील मुद्यांवर पाठिंबा दिला आहे. ते मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. ते असे की, लोक विकास महाआघाडी ज्यांच्या नेतृत्वात उभी आहे. ते राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाईचे नागरीकांसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या पुर्ण करण्यासाठी समाजवादी पार्टी लोक विकास महाआघाडीस जाहीर पाठींबा देत आहे. १) अंबाजोगाई जिल्हा निर्मातीचा प्रश्न, २) बुट्टेनाथ तलावास मान्यता घेणे., ३) काळवटी साठवण तलावाची उंची वाढवणे, ४) बुट्टेनाथ परिसरामध्ये हजारो एकर जमीन डोंगराळ आहे. या ठिकाणी आनेक पर्यटक येतात. या ठिकाणाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा., ५) स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्वांत मोठी ओ.पी.डी असणारा दवाखाना आहे. औषधांसाठी लागणारा निधी व तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणुक व स्टाफ कमी प्रमाणात असल्यामुळे सदरचा स्टाफ वाढवणे व रूग्णांना त्याचा फायदा कसा देता येईल., ६) अंबाजोगाई शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे उपकेंद्राचे बांधकाम सुरू करणे.,७) घांटनादुर ते अंबाजोगाई रेल्वे सेवा सुरू करणे., ८) अंबाजोगाई शहरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तयार करणे, अंबाजोगाई शहरात आवश्यक तेथे नवीन शौचालयांची निर्मिती करणे व बंद असलेले सर्व शौचालय सुरू करणे., ९) अंबाजोगाई शहरातील सर्व भागातील पोलवरील लाईट सुरू करणे., १०) अंबाजोगाई शहरात नळाला तीन दिवसाला पाणी सोडण्यात यावे व नाल्या स्वच्छ करण्यात याव्यात., ११) अंबाजोगाई नगरपरीषदेमध्ये काम करणारे कंत्राटी कामागारांना वेळेवर वेतन देण्यात यावे व अंबाजोगाई शहरातील घंटा गाडी सुरळीत ठेवाव्यात., १२) अंबाजोगाई नगरपरीषदेमध्ये महिला भगिनी विविध कार्यालयीन कामासाठी येतात त्यांची कामांसाठी किंवा तक्रारी दूर करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात यावी., १३) अंबाजोगाई शहरात शिक्षणासाठी अनेक ठिकाणांवरून मुली येतात. त्यामुळे शाळा व महाविद्यालये व शिकवणी वर्ग (ट्युशन, कोचिंग क्लासेस) भागात दामीनी पथकाची गस्त सुरू ठेवणे. या सर्व मुद्यांवर पापा मोदी हे विशेष लक्ष देवून आगामी काळामध्ये काम करतील म्हणून समाजवादी पार्टी आज लोक विकास महाआघाडीचे प्रमुख व नगराध्यक्षपदाचे व नगरसेवकपदाचे सर्वच ३१ उमेदवार यांना जाहीर पाठिंबा देत आहोत असे समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे, अंबाजोगाई शहराध्यक्ष राजेश मातादिन परदेशी यांनी यावेळी सांगितले. व शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी लोक विकास महाआघाडी सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पाठिंब्यामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या प्रारंभीच लोक विकास महाआघाडीची ताकद अधिक वाढल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे व दिसून येत आहे. जाहीर पाठिंबा देताना समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष शेख जिलानी, केज विधानसभा अध्यक्ष शेख शौकत, अंबाजोगाई शहर उपाध्यक्ष शेख शाकीर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.