Breaking

अंबाजोगाई शहरात परिवर्तन घडविण्यासाठी नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांना विजयी करा

Updated: नोव्हेंबर 17, 2025

By Vivek Sindhu

भाजपा‌ युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अक्षय भुमकर यांचे आवाहन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

भाजपा‌ युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अक्षय भुमकर यांचे आवाहन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – नगरपरिषद निवडणुकीत अंबाजोगाई शहरात परिवर्तन घडविण्यासाठी नगराध्यक्षपदासाठी नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांना अंबाजोगाईकरांनी भरभरून मते देवून विजयी करावे असे आवाहन अंबाजोगाई भाजपा‌ युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अक्षय भुमकर यांनी केले आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अंबाजोगाई भाजपा‌ युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अक्षय भुमकर यांनी सांगितले आहे की,‌ नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांच्या उमेदवारीने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. मागील चार दशकांहून अधिक काळ जनसेवेच्या माध्यमातून ओळख निर्माण केलेले काकाजी हे अंबाजोगाईतील प्रत्येक घराघरात परिचित नांव आहे. त्यांच्या ४७ वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांनी कधीही व्यक्तिगत पदाचा मोह धरला नव्हता व नाही. घरात फक्त आमदारकीचे एकच पद, तर इतर सर्व पदे ही कार्यकर्त्यांसाठी असली पाहिजेत अशी त्यांची नेहमीची भूमिका राहिली होती. परंतु, यावेळी प्रथमच सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांनी अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अनुकूलता दाखविली. काकाजी यांचा समाजकारण आणि वैयक्तिक संपर्काच्या बळावर त्यांनी प्रत्येक समाजातील सर्व घटकांना आपलेसे केलेले आहे. एखाद्याचे काम करताना तो आपला आहे की परका, समर्थक आहे की विरोधक असा किरकोळ विचार त्यांनी कधीच केला नाही. तर नेहमीच माणसं जोडली. नंदकिशोर मुंदडा यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची सर्वांत मोठी ताकद व बाजू आहे. रूग्णालय असो वा वीज वितरण कार्यालय, नागरिकांच्या कोणत्याही समस्येवर त्यांचा त्वरित प्रतिसाद असतो. केज विधानसभा मतदारसंघातील कोणीही सुज्ञ नागरिकाने काकाजींना फोन केला आणि काम झाले नाही असे उदाहरण नाही, असे सर्व नागरिक आम्ही प्रभागात प्रचारानिमित्त संवाद साधताना आम्हाला तेथील नागरिक उत्साहाने ही बाब सांगतात. सर्वांच्या अडचणींना स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे धावून जाणारे, २४ तास लोकांसाठी उपलब्ध असलेले हे नेतृत्व मागील ३५ वर्षांपासून नागरिकांच्या मनावर राज्य करीत आहे. त्यामुळे अंबाजोगाईचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी यावेळी नंदकिशोर मुंदडा यांनी स्वतः नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशी सर्व कार्यकर्त्यांसह शहरातील अनेक नागरिकांची ही तीव्र इच्छा होती. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होताच सर्व कार्यकर्त्यांत एकप्रकारे उत्साह निर्माण झाला आहे. तसेच सामान्य जनतेतून देखील त्यांच्या उमेदवारीचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. नंदकिशोर मुंदडा यांनी मोठ्या उत्साहात प्रचार सुरू केला असून आजवरच्या हयातीत इतरांसाठी मत मागणारे काकाजी यावेळी प्रथमच स्वतःसाठी मत मागत आहेत. शहरातील विविध भागांत भेटीगाठींमध्ये शेकडो नागरिक स्वतःहून उपस्थित राहून त्यांचे स्वागत करत आहेत. सर्वच ठिकाणी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून नंदकिशोर मुंदडा यांच्या रूपाने अंबाजोगाई शहराला एक अनुभवी, सुसंवादी आणि लोकाभिमुख नेतृत्व मिळणार असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. ‘काकाजी’ हेच नगराध्यक्ष व्हावेत, अशी जनतेची उघड इच्छा आता व्यक्त होत आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांच्या नेतृत्त्वाखाली माझे नेते अक्षय भैय्या मुंदडा आणि भाजपा शहराध्यक्ष संजय भाऊ गंभीरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते काकाजी यांना विजयी करण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी माहिती अंबाजोगाई भाजपा‌ युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अक्षय भुमकर यांनी दिली आहे. तसेच त्यांनी नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांना विजयी करावे असे आवाहन ही अंबाजोगाईच्या जनतेला केले आहे.


Categories

Recent Posts