Breaking
Updated: नोव्हेंबर 7, 2025
कुंबेफळ शिवारात शेतवादातून शेतकऱ्याला मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : ग्रामीण परिसरातील कुंबेफळ शिवारात जुन्या शेतवादातून शेतकऱ्याला लाकडी दांड्याने आणि वायरने मारहाण करण्यात आली. ही घटना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
दिगांबर निवृत्ती थोरात (वय ३६, व्यवसाय शेती, रा. कुंबेफळ ता. अंबाजोगाई जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी आपल्या शेतातील काम आटोपून घरी परत येत असताना हनुमंत श्रीधर कदम, श्रीकांत हनुमंत कदम, कृष्णा हनुमंत कदम, वसंत दशरथ भोसले आणि कृष्णा तुकाराम माने (सर्व रा. कुंबेफळ) यांनी त्याच्यावर जुन्या शेतवादातून लाकडी दांडा व वायरने हल्ला करून मारहाण केली. फिर्यादीची पत्नी बचावासाठी गेली असता तिलाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी उळे करीत आहेत. फिर्यादी आज पोलिस ठाण्यात हजर झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.