Breaking

‘एकता दौड’मध्ये धावले अधिकारी, कर्मचारी, व सामाजिक कार्यकर्ते

Updated: नोव्हेंबर 1, 2025

By Vivek Sindhu

'एकता दौड'मध्ये धावले अधिकारी, कर्मचारी, व सामाजिक कार्यकर्ते...

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाईत एकता दौडच्या माध्यमातून पोलिसांकडून सामाजिक एकात्मतेचा संदेश

अंबाजोगाई -: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यासाठी अंबाजोगाई पोलिस दलाच्या वतीने शुक्रवारी सकाळी रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते. यातून सामाजिक एकात्मतेचा संदेश देत पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, युवती यांचा मोठा सहभाग होता.

या एकता दौड चे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या सह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या दौड मध्ये

स्थानिक नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, क्रीडा संघ आणि स्वयंसेवी संस्था यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रत्येक ठिकाणी दौडनंतर राष्ट्रीय एकतेचा संकल्प घेण्यात आला. उपक्रमाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्य आणि देशभक्तीचा संदेश सर्व स्तरांवर पोहोचवणे, देशातील सर्व घटकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा, सामाजिक सौहार्दाचा आणि भिन्नतेतून एकतेचा संदेश जनमानसात पोहोचवणे हा होता.

एक भारत, श्रेष्ठ भारतचा जयघोष…
अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके म्हणाल्या की , सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय ऐक्याचा पाया घातला. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजातील प्रत्येक घटकाने देशाच्या एकतेसाठी योगदान द्यावे, हीच खरी त्यांना आदरांजली आहे.

यावेळी “एक भारत-श्रेष्ठ भारत”, “अखंड भारत-जय भारत” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


Categories

Recent Posts