Breaking
Updated: ऑगस्ट 5, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : राज्यात सक्रिय होत असलेल्या मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यालाही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. ६, ७ आणि ८ ऑगस्ट या सलग तीन दिवस बीड जिल्ह्यात हलक्यापासून मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
६ ऑगस्ट रोजी बीडसह परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव, सोलापूर आदी मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ७ ऑगस्ट रोजीही बीड जिल्ह्यात पाउस बरसणार असून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचा जोर वाढणार आहे. ८ ऑगस्ट रोजी बीडसह नगर, सोलापूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, आगामी पावसामुळे खरीप हंगामाला चालना मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी नद्या-नाल्यांच्या प्रवाहाजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.