Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

२७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत श्री योेगश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव

Updated: नोव्हेंबर 26, 2025

By Vivek Sindhu

२७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत श्री योेगश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel
अंबाजोगाई :-महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान तथा अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव २७ नोव्हेंबर ते डिसेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराधी बसणाऱ्या महिलांची सोय तसेच मंदिराची रंगरंगोटी भविकांसाठी विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात आले आहे.     २७ नोव्हेंबर गुरुवारी सकाळी १० वाजता वर्णी पूजेने मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत आहे. २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत मंदिर परिसरात संगीत भजन, कीर्तन, प्रवचन व विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गशीर्ष महोत्सवाच्या कालावधीत मंदिरात किमान ५ ते ७ हजार महिला निवासी राहून आपला नवस पूर्ण करतात. या आराधी महिलांच्या निवासाची संपूर्ण व्यवस्था देवल कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच देवीच्या दर्शनासाठी ठिकठिकाणांहून येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होते. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांना विविध सोयी व सुविधा महोत्सवाच्या काळात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशी माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार विकास तरंगे, सचिव गिरधारीलाल भराडीया यांनी दिली. -

Categories

Recent Posts