Breaking
Updated: नोव्हेंबर 20, 2025
स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई, 26 किलो गांजा जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : जिल्ह्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत विशेष मोहिमेच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने परळी ग्रामीण हद्दीत छापा टाकत 25.950 किलो गांजा जप्त केला. कापसाच्या शेतात लपवून ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी 16 ते 22 नोव्हेंबरदरम्यान एनडीपीएस कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सर्व पथकांना चेकिंग वाढवण्याचे निर्देश दिले होते.
दि. 20 नोव्हेंबर रोजी पोउपनि महेश विघ्ने हे पथकासह परळी ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, हेळंब गावातील युवराज अण्णा आंधळे यांनी गट क्र. 746 मधील स्वतःच्या कापसाच्या शेतात अवैधरीत्या गांज्याची लागवड केली आहे. विघ्ने यांनी तत्काळ माहिती वरिष्ठांना देत परळी ग्रामीणचे प्रभारी पोलीस निरीक्षक सय्यद यांच्याकडे कळवली. वरिष्ठांची परवानगी मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि परळी ग्रामीण पोलिसांचे संयुक्त पथक पंचांसह शेतात दाखल झाले.
छाप्यात कापसामध्ये लपवून ठेवलेला तब्बल 26 किलो गांजा सापडला. त्याची किंमत सुमारे 1,29,750 रुपये इतकी आहे. छाप्याची माहिती मिळताच आरोपी युवराज अण्णा आंधळे हा फरार झाला. त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन परळी ग्रामीण येथे पोउपनि अंकुश निमोणे यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवली असून आरोपीचा शोध सुरू आहे. नागरिकांकडे या प्रकरणाबाबत अधिक माहिती असल्यास एनडीपीएस सेलला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोनि सय्यद, पोउपनि महेश विघ्ने, अंकुश निमोणे, रियाज शेख, केकाण, जोगदंड, भताने, अंधळे, घोडके व मराडे यांच्या पथकाने केली.