Breaking

मेहुण्याकडून तरुणावर लाकडी काठीने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

Updated: जून 18, 2026

By Vivek Sindhu

मेहुण्याकडून तरुणावर लाकडी काठीने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव: तालुक्यातील बाभळगाव येथे कौटुंबिक वादातून एका तरुणावर आणि त्याच्या भावजाईवर लाकडी काठीने हल्ला करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. १६ जून रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बाभळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ही घटना घडली असून, याप्रकरणी १७ जून रोजी दिंद्रुड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांडुरंग ज्ञानोबा माळी (वय ३०, रा. बाभळगाव) हे चौकात उभे असताना, त्यांचे नातेवाईक असलेले आरोपी विठ्ठल उत्तमराव माळी, सत्तुबाई विठ्ठल माळी आणि उत्तमराव माळी यांनी तिथं येत जुन्या वादातून कुरापत काढली. यावेळी आरोपी विठ्ठल माळी याने पांडुरंग यांच्या डोक्यात लाकडी काठीने जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच अन्य आरोपींनी फिर्यादीच्या भावजाईला अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि जिवंत मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यानंतर जखमी पांडुरंग माळी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी सहाय्यक फौजदार मोमीन पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts