Breaking

बीड-परळी रस्त्यावर तरुणाला लुटले; दुचाकीसह आयफोन आणि रोख रक्कम लंपास

Updated: जून 18, 2026

By Vivek Sindhu

बीड-परळी रस्त्यावर तरुणाला लुटले; दुचाकीसह आयफोन आणि रोख रक्कम लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड-परळी रस्त्यावरील पांगरबावडी शिवार परिसरात एका तरूणाची दुचाकी, महागडा आयफोन आणि रोख रक्कम अज्ञात दोन चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १६ जून रोजी रात्री १० ते ११ च्या सुमारास इंडियन पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली असून, याप्रकरणी १७ जून रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, ढेक्कणमोहा येथील रहिवासी असलेला रोहित बाबासाहेब शिंदे (वय २४) हा तरुण बीडहून आपल्या गावाकडे जात होता. पांगरबावडी शिवारात आल्यानंतर त्याने आपली हिरो होंडा शाईन दुचाकी (क्र. एम.एच.२३ BE ०५२२) पेट्रोल पंपासमोर उभी केली आणि तो काही अंतरावर लघवीसाठी गेला. याच संधीचा फायदा घेऊन तिथे आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्याची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरली. तसेच गाडीच्या हँडलला अडकवलेल्या पिशवीत ठेवलेला ३५ हजार रुपयांचा ‘आयफोन १५ प्लस’ मोबाईल आणि ३ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ७८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी रोहित शिंदे याने दिलेल्या तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार करांडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts