Breaking
Updated: जून 18, 2026
वाहतूक शाखेच्या दक्षतेमुळे चोरीची बुलेट सापडली
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे चोरीची रॉयल एनफिल्ड (बुलेट) मोटारसायकल हस्तगत करण्यात यश आले असून ती पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे.
बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वैभव पाटील व त्यांच्या पथकातील अंमलदार शहरात नियमित पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयास्पद बेवारस बुलेट मोटारसायकल आढळून आली. वाहनाची सखोल पडताळणी केली असता सदर मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान ही मोटारसायकल उरळी कांचन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 402/2024 अन्वये भा.न्या.सं. कलम 3(5) व 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास उरळी कांचन पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
यामुळे जप्त करण्यात आलेली रॉयल एनफिल्ड (बुलेट) मोटारसायकल पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वैभव पाटील यांनी उरळी कांचन पोलीस ठाण्याचे तपास अंमलदार पोलीस हवालदार श्री. सचिन मोरे यांच्याकडे मुद्देमाल हस्तांतरण ताबा पावती व सुपूर्दनाम्यासह रीतसर स्वाधीन केली.
ही उल्लेखनीय कामगिरी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वैभव पाटील व त्यांच्या संपूर्ण पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
चोरीचा मुद्देमाल शोधून तो संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्याच्या या कार्यवाहीमुळे बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या दक्षतेचे व तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.