Breaking

पिंपळगाव येथे बंद घर फोडले; ९० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Updated: जून 18, 2026

By Vivek Sindhu

वडवणी येथील शिक्षक कॉलनीत घरफोडी; २६ हजारांचा मुद्देमाल लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: तालुक्यातील पिंपळगाव येथे चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घरफोडी १६ जून रोजी रात्री साडेदहा ते १७ जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी १७ जून रोजी केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी सुरेश संजीवन घुले (वय ३४) हे आपल्या कुटुंबासह रात्रीचे जेवण करून घराच्या माडीवर झोपण्यासाठी गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी खालच्या खोलीच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप कौशल्याने तोडून आतील ६५ हजार रुपये किमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागिने, ज्यामध्ये झुंबर, गंठण, टापस, कानातील कुडू आणि मण्यांचा समावेश आहे, तसेच २५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. सकाळी घरफोडीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून केज पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक निकम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts